आई कुठे काय करते: अभीसाठी टिफिन घेऊन गेलेल्या अनघाला बसला धक्का, नर्सकडून असं काय कळलं तिला?

0
6


मुंबई : बरेच दिवस आई कुठे काय करते मालिकेत अनघा आणि अभी यांच्या मधे बिनसलेलं प्रेक्षक पाहतायत. अनघानं काहीही केलं तरी अभी तिच्याशी भांडायलाच लागतो. सतत तिला बोलतो, टोमणे मारतो. खरं तर यामुळे गरोदर असलेली अनघा वैतागली आहे. त्यात संजनानं अभीचं बाहेर काही प्रकरण नाही ना, अशी शंका बोलून दाखवली.

आता पुढच्या भागाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात अभी घरी टिफिन विसरला म्हणून हाॅस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे नर्स तिला सांगते, डाॅक्टर अभी हल्ली रोज लवकर घरी जातात. ते ऐकून अनघाला धक्का बसतो. त्याआधीही अभी रात्री उशिरा घरी आल्यावर, तू कुठे होतास? असं अनघानं विचारल्यावर तो भयंकर संतापतो. अनघा सगळ्यांना सांभाळून घेणारी दाखवलीय. आता पुढे ती अभीची झाडाझडती घेणार की नाही हे येत्या दिवसात कळेल.

राहुल- दिशासारख्या हटके लव्ह स्टोरीच्या सारेच पडतील प्रेमात

याच व्हिडिओत आणखी एक सीन आहे. त्यात अनिश अरुंधतीला विचारतो तुम्ही आशुतोष चाचूबद्दल काय विचार केला आहात? अनिश म्हणतो, मला तुम्हा दोघांना आनंदी पाहायचंय आणि तुम्ही दोघं एकत्र असलात की खूश असता. अरुंधती काय उत्तर देते, तेही पुढच्या काही भागात कळेल.


आता आशुतोषच्या घरी सुलेखा ताई नाहीत. त्या बाहेरगावी गेल्यात. म्हणून आशुतोषच्या जेवणाखाण्याची जबाबदारी अरुंधतीनं उचलली आहे. तिचा मुक्काम आशुतोषच्या घरी आहे. आता पुढच्या भागाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात कांचन आणि आप्पा अरुंधतीला कशी आहेस विचारायला फोन करतात. कांचन म्हणते, आम्ही तुला भेटायला घरी येतो. तेव्हा अरुंधती म्हणते, नको, मी घरी नाही. यावर कांचन म्हणते, अग ऑफिसला कशाला गेलीस? अरुंधती म्हणते, मी ऑफिसमध्ये नाही. आशुतोषच्या घरी आहे.

कंगनासाठी मराठमोळी अभिनेत्री आहे रिअल क्वीन, तिला म्हणाली ‘जिंदाबाद’

हे ऐकल्यावर कांचन नाराज होते. आप्पा म्हणतात, अग गरजा असतात माणसांच्या. त्यावर कांचन म्हणते पदरात तीन मुलं आहेत. या वयात कसल्या गरजा? मग आप्पा कांचनला खडसावतात, गरजा फक्त शारीरिक नसतात. त्या मानसिकही असतात.

मालवणी भाषा बोलणाऱ्यांना बाहेर किंमत नाही, असं सांगितलं जायचं | नम्रता पावसकर



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here