मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा संप मागे; १ ऑक्टोबरपासून होणार भाडेवाढ!

0
2सीएनजीच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी रिक्षा-टॅक्सी चालक २६ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीतनंतर हा संप तत्वत: मागे घेत असल्याचं मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने स्पष्ट केलं आहे.

सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने मुंबईतील रिक्षा – टॅक्सी चालक १५ सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. पण, १३ सप्टेंबर रोजी उदय सामंत यांची मुंबई टॅक्सी मेन्स युनियनसमवेत बैठक झाली आणि संप मागे घेतला. मात्र, बैठकीत शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा २६ सप्टेंबरपासून हा बेमुदत संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं.

त्याच पार्श्वभूमीवर आज ( २३ सप्टेंबर ) उदय सामंत यांची मुंबई टॅक्सी मेन्स युनियनसह बैठक पार पडली. या बैठकीत संप तत्वत: मागे घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. पुढील आठवड्यात एमएमआरटीएच्या बैठकीत भाडेवाढीवर अंतिम निर्णय होईल. त्यानंतर टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपये तर रिक्षाच्या भाड्यात दोन रुपये वाढ केली जाईल. १ ऑक्टोबरपासून नवी भाडेवाढ लागू करण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here