सांगली : मुलगी ‘नकोशी’ ….दोन्ही वेळा मुलीच जन्माला आल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा खून

0
2दोन्ही मुलीच झाल्याचा राग मनात धरून विवाहित तरूणीचा पतीनेच विहीरीत ढकलून देउन खून केल्याची घटना इस्लामपूरजवळ कापूसखेड गावच्या शिवारात घडली. याबाबत तरूणीच्या माहेरच्या तक्रारीनंतर पतीला इस्लामपूर पोलीसांनी अटक केली आहे.इस्लामपूर येथील कौस्तुभ कृष्णराव सरनौबत (वय 30) हे पत्नी राजनंदिनी हिला प्रभातफेरीसाठी दुचाकीवरून रविवारी पहाटे गेले होते. कापूसखेड रस्त्याकडेला असलेल्या पाण्याचे भरलेल्या विहीरीत बुडून तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात पत्नी विहीरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची तक्रार दिली.

मात्र, तरूणीचा भाउ मिलिंद भोसले (रा. कोल्हापूर) यांनी या आकस्मिक मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. बहिणीला दोन मुलीच झाल्या असल्याने पतीकडून त्रास होत होता. यामुळेच तिला पोहता येत नाही हे तिच्या पतीला माहिती होते. जर तिला पोहता येत नव्हते तर ती विहीरीजवळ गेलीच कशी याचा संशय आल्याने याने तरूणीच्या भावाने पतीनेच तिला विहीरीत ढकलून खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. यामुळे पोलीसांनी पती विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here