50 शेड्स ऑफ दीपा…अभिनेत्रीचा मेकअप पाहून नेटकरी उडवतायत खिल्ली – rang majha vegla deepa’s makeup memes viral on social meida

0
1


मुंबई: सौंदर्याबाबत ठराविक मापदंड नाही. कुणाला गोरा रंग आवडतो, तर कुणाला सावळ्या रंगात सौंदर्य दिसते. असं असलं तरी आजही रंगवारून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. असाच विषय ‘रंग माझा वेगळा’ असं या मालिकेतून मांडण्यात आला. या मालिकेत रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत दिसतेय. या मालिकेतील दीपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्यारंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आलं आहे. खऱ्या आयुष्यात मात्र ती फार वेगळी दिसते.

रंग माझा वेगळा ही मालिका नेहमीच चर्चेत असते. मालिकेची कथा जितकी चर्चा असते. त्याहून जास्त दीपाचा मेकअप नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. तिचा मेकअप अनेकदा वेगळा वेगळा दिसतो. सावळ्या रंगच्या अनेक छटा तिच्या मेकअपमध्ये दिसून येतात. नेटकऱ्यांनी नेमकं हे घेरलं आणि मीम्स व्हायरल केले.


या मालिकेत दीपाची भूमिका साकारणारी रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात फार वेगळी दिसते. ती दिसायला अतिशय सुंदर आहे. तिनं नांदा सौख्य भरे या मालिकेत काम केलं आहे. सध्या रेश्माच्या दीपा या भूमिकेची खिल्ली उडवली जात असली तरी, ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचं दिसत आहे.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here