aai kuthe kay karte, Video : कांचननं काळजीनं अरुंधतीला केला फोन, पण एक गोष्ट कळल्यावर झाली नाराज – aai kuthe kay karte madhurani prabhulkar as arundhati staying with ashutosh

0
4


मुंबई : महिला आश्रमात आश्रयाला आलेल्या महिलेला आशुतोष आणि अरुंधतीनं तिच्या नवऱ्यापासून वाचवलं. पण झटापटीत आशुतोषचा हात फ्रॅक्चर झाला. त्याला जखमही झाली. अरुंधती त्याला घेऊन रुग्णालयातही गेली. नंतर त्याला डिस्चार्ज मिळाल्यावर सगळे घरी आले.

आता आशुतोषच्या घरी सुलेखा ताई नाहीत. त्या बाहेरगावी गेल्यात. म्हणून आशुतोषच्या जेवणाखाण्याची जबाबदारी अरुंधतीनं उचलली आहे. तिचा मुक्काम आशुतोषच्या घरी आहे. आता पुढच्या भागाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात कांचन आणि आप्पा अरुंधतीला कशी आहेस विचारायला फोन करतात. कांचन म्हणते, आम्ही तुला भेटायला घरी येतो. तेव्हा अरुंधती म्हणते, नको, मी घरी नाही. यावर कांचन म्हणते, अग ऑफिसला कशाला गेलीस? अरुंधती म्हणते, मी ऑफिसमध्ये नाही. आशुतोषच्या घरी आहे.

लग्न पत्रिका की माचिक बॉक्स; रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नाचं वेडिंग कार्ड पाहिलं का?

हे ऐकल्यावर कांचन नाराज होते. आप्पा म्हणतात, अग गरजा असतात माणसांच्या. त्यावर कांचन म्हणते पदरात तीन मुलं आहेत. या वयात कसल्या गरजा? मग आप्पा कांचनला खडसावतात, गरजा फक्त शारीरिक नसतात. त्या मानसिकही असतात.

पुढच्या भागांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. त्यात येत्या रविवारी मालिकेचा महाएपिसोड आहे. त्यात संजनानं प्रेग्नन्सी टेस्ट केल्याचं समोर येणार आहे. अनिरुद्धनं जरी म्हटलं, मी जबाबदारी घेणार नाही. तरीही अरुंधती संजनाच्या मागे उभी राहणार.

दरम्यान, अनिरुद्ध आशुतोषच्या घरी येतो. तो खूप चिडला आहे. कारण त्याला कळतं अनिषनं ईशाच्या काॅलेजमध्ये प्रवेश घेतलाय. तो म्हणतो, आता तू कारण काढून ईशाच्या अवतीभवती राहणार. मी ते अजिबात खपवून घेणार नाही. तू तुझं काॅलेज बदल.

देवमाणूस पुन्हा येणार? तिसऱ्या सीझनची चर्चा सुरू, हा व्हिडिओ ठरतोय कारण

आशुतोषच्या घरी अरुंधती, नितीन सगळे जण आहेत. अनिश अनिरुद्धचं रूप पाहून घाबरून जातो. पण आशुतोष अनिरुद्धला ठणकावून सांगतो, तुम्हाला काही प्राॅब्लेम असेल तर तुम्ही ईशाचं काॅलेज बदला. अनिश नाही बदलणार. हे ऐकून अनिरुद्ध अवाक होतो. आता पुढे काय हे काही दिवसात समोर येईलच.

कोकणातल्या वातावरणाची एनर्जी शुटिंगमध्ये दिसून येते | विक्रम गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here