adani group, आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’, काय आहे क्षेत्रात उतरण्याचे कारण; सांगितले पुढचे टार्गेट – ambuja cements and scc gautam adani reveals why adani group enters in cement manufacturing business

0
7


मुंबई : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता भारतातील आघाडीचे सिमेंट उत्पादक बनण्याच्या तयारीत आहे. अंबुजा सिमेंट आणि ACC चे ६५,००० दशलक्ष डॉलरमध्ये संपादन पूर्ण केल्यानंतर अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी म्हणाले की त्यांच्या समूहाने सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करण्याची आणि देशातील सर्वात फायदेशीर उत्पादक बनण्याची योजना तयार केली आहे.

१७ सप्टेंबर रोजी अंबुजा सिमेंट आणि एसीसीचे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणाले की त्यांचा समूह एका झटक्यात देशातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. अदानी समुहाने गेल्या आठवड्यात या दोन कंपन्यांमधील होल्सीमच्या स्टेकचे अधिग्रहण पूर्ण केले. हे संपादन ऐतिहासिक असल्याचे सांगून, ते म्हणाले की ही खरेदी पायाभूत सुविधा आणि साहित्य क्षेत्रातील भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा इनबाउंड M&A व्यवहार आहे आणि ४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला.

टाटाही सांभाळू शकले नाही जी कंपनी आता त्याला अदानींची पुढची पिढी तारणार

अदानी सिमेंट क्षेत्रात का उतरले?
अदानी म्हणाले की, या व्यवसायात आमचा प्रवेश अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आधुनिक जगातील सर्वात मोठ्या आर्थिक विकासासाठी सज्ज आहे. सिमेंट क्षेत्रात येण्याचे कारण स्पष्ट करताना अदानी म्हणाले की, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक देश आहे. आपला दरडोई वापर चीनच्या १,६०० किलोच्या तुलनेत फक्त २५० किलो आहे. अशा परिस्थितीत भारतातील सिमेंटच्या वापरात मोठी वाढ अपेक्षित आहे, ज्याचा फायदा सिमेंट कंपन्यांना होणार आहे.

अदानींचा झंझावात… अंबानीनंतर टाटांवर मात; मार्केट कॅपमध्ये कंपनी देशातील सर्वात मौल्यवान

पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रातील ट्रिलियन-डॉलरच्या गुंतवणुकीसह देशाच्या विकासाची कहाणी उलगडत असताना, सिमेंट हा आपल्या पायाभूत सुविधा व्यवसायासाठी, विशेषत: समूहाचा बंदरे आणि दळणवळण / लॉजिस्टिक व्यवसाय, हरित ऊर्जा व्यवसाय आणि विकसित होत असलेल्या ई-कॉमर्स व्यासपीठ या सर्वांसाठी एक समर्पक जोड व्यवसाय ठरेल, असेही अदानींनी म्हटले.

श्रीमंतांच्या यादीत गरुड भरारी; अदानींनी लेकाकडे दिली मोठी जबाबदारी; बिर्ला ग्रुपला भिडणार

दरम्यान, त्यांच्या समूहाच्या वाढीच्या तत्त्वज्ञानावर अदानी म्हणाले की हा भारताच्या वाढीवरचा विश्वास आहे. भारत २०५० पर्यंत २५-३० ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असेल, जी प्रचंड वाढीच्या शक्यता दर्शवते. हा समूह जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा कंपनी आहे आणि ग्रीन हायड्रोजनसह स्वच्छ ऊर्जा व्यवसायात ७० अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचे वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले. २५ टक्के प्रवासी वाहतूक आणि ४० टक्के एअर कार्गोसह अदानी समूह हा देशातील सर्वात मोठा विमानतळ ऑपरेटर आहे. तसेच ही देशातील सर्वात मोठी बंदरे आणि लॉजिस्टिक कंपनी आहे, ज्याचा ३० टक्के बाजार हिस्सा आहे.

अदानी समूहाचे मार्केट कॅप २६० अमेरिकी बिलियन डॉलर असून भारतातील कोणत्याही कंपनीपेक्षा वेगाने वाढले आहे, ते पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here