Amruta Khanvilkar And I Have No Enmity Sonalee Kulkarni Video Goes Viral

0
2


Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) संदर्भात भाष्य करताना दिसत आहे. 

सोनाली म्हणत आहे की,”तुम्ही अमृताचा फोटो दाखवणार हे मला माहितच होतं. कारण अमृतानेच तशी मागणी केली होती. अमृता आपला प्रवास एकत्र सुरू झाला आहे. मला माहित नाही. पण आपलं काहीतरी कनेक्शन आहे. त्यामुळेच नशिबाने आपल्याला एकमेकांसमोर आणलं आहे. पण तरीदेखील आपली कधीच मैत्री झाली नाही.”

“मी काम करत असलेल्या सर्वांसोबत माझी मैत्री होते. पण आपली कधीच मैत्री झाली नाही. पण तरीही आपल्याला एकमेकींबद्दल खूप माहिती आहे. एकमेकींना आपण समजून घेऊ शकतो. नटरंग सिनेमात आपण दोघीही असलो तरी एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळे लोकांनी आपल्यात शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आमच्यात वैर नाही.”


‘बस बाई बस’ या कार्यक्रमासंदर्भात अभिनेता सुबोध भावे म्हणाला,”मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. पण, संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळली, तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला”. 

संबंधित बातम्या

Bus Bai Bus : ‘बस बाई बस’च्या आगामी भागात क्रांती रेडकर अन् भरत जाधव होणार सहभागी; थिरकणार ‘कोंबडी पळाली’वर

Bus Bai Bus :  ‘नवऱ्याचा फोन चेक करता का?’; मेधा मांजरेकरांनी दिलं मजेशीर उत्तरLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here