bhuvneshwar kumar, रोहित शर्मा करतोय एकच मोठी चूक… तीन सामने, तीन पराभव अन् फक्त एकच गोष्ट ठरतेय मारक – what to do with rohit sharma … three matches, three defeats and only one thing is 19th over by bhuvneshwar kumar

0
5


मोहाली : भारतीय संघाला ट्वेन्टी-२० सामन्यात सलग तीन पराभव आता पत्करावे लागले. पण या तिन्ही पराभवाचे एकच कारण आता समोर येत आहे. त्यामुळे रोहित शर्माने आता नेमकं करायचं तरी काय, हा प्रश्न आता भारतीय संघाला पडला आहे.

भारताचे यापूर्वीचे दोन्ही पराभव आशिया चषकात झाले होते. हे दोन्ही पराभव सुपर- ४ या फेरीत झाले होते. या फेरीत पाकिस्तानने भारताचा पहिला पराभव केला होता. त्यानंतर श्रीलंकेने भारतावर विजय मिळवला होता. हा भारताचा सलग दुसरा पराभव होता. त्यानंतर आजच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. पण या तिन्ही पराभवांचे एकमेव कारण आता समोर आले आहे.

या तिन्ही सामन्यांमध्ये एकच गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे १९वे षटक. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या तिन्ही सामन्यांमध्ये हे षटक भारताचा हुकमी एक्का असलेल्या भुवनेश्वर कुमारनेच टाकले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या १९व्या षटकात भुवीने १९ धावा दिल्या होत्या आणि भारताच्या हातून सामना निसटला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील १९व्या षटकात भुवीने १४ धावा दिल्या होत्या. आज झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भुवीने १६ धावा दिल्या होत्या. त्यामुळे भारतासाठी १९वे षटक धोक्याचे ठरते आहे. त्यामुळे आता या १९व्या षटकाचे करायचे काय, हा मोठा प्रश्न आता रोहित शर्माबरोबर भारतीय संघाला सोडवावा लागणार आहे.

भारतीय संघाने आजच्या सामन्यात सोडले तीन झेल…
हार्दिकच्या या आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ग्रीन बाद होऊ शकला असता. कारण तिसऱ्या चेंडूवर ग्रीनचा झेल उडाला होता आणि हा झेल अक्षर पटेलने सोडला. त्यामुळे ग्रीनला यावेळी ४२ धावांवर जीवदान मिळाले. अक्षर पटेलच्या त्यानंतरच्या नवव्या षटकात स्टीव्हन स्मिथला जीवदान मिळाले. या नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर लोकेश राहुलने स्मिथचा झेल सोडला आणि त्याला जीवदान दिले. त्यावेळी स्मिथ हा १९ धावांवर होता. त्यानंतर स्मिथने दमदार फलंदाजी केली आणि धावगती वाढवली. त्यानंतर ही गोष्ट घडली ती १८व्या षटकात. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हर्षलकडून आपल्या गोलंदाजीवरच ही चूक घडल्याचे पाहायला मिळाले. हर्षलने हा दुसरा चेंडू चांगला टाकला होता, या चेंडूचा समर्थपणे सामना वेडला करता आला नाही. त्यामुळे हा चेंडू मारताना तो चकला आणि त्याचा झेल उडाला. हा झेल थेट हर्षलजवळ आला. हर्षल आता हा झेल पकडेल आणि वेड बाद होईल, असे वाटत होते. पण हा झेल हर्षलच्या हातून सुटला आणि वेडला जीवदान मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here