bjp mla jaykumar gore attacks ramraje naik nimbalkar in phaltan ssa 97

0
2भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अप्रत्यपणे निशाणा साधला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेमधील घराणेशाहीवर सुद्धा टीका केली आहे. एखादा बैल अवताला बसला तर त्याला आपण बाजारात नेतो. मात्र, हा बैल २५ वर्षे झालं बसलायं, आता तरी बदला, अशा शब्दांत जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त फलटणध्ये संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होते. तेव्हा जयकुमार गोरे बोलत होते. “पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, मार्केट कमिटीमध्ये त्यांच्या घरातील सदस्य आहेत. विधानपरिषदेचा सभापती तेच, मंत्री सुद्धा त्यांच्यातीलच,” असे गोरे यांनी नाईक निंबाळकर यांच्यातील घराणेशाहीवर टीका केली आहे.

हेही वाचा – “बाळासाहेब म्हणत असतील, मी काय गद्दारांना…”; अरविंद सावतांनी घेतला रामदास कदमांचा समाचार

“पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी”

पवार कुटुंबातील घराणेशाहीवर सुद्धा गोरे यांनी निशाणा साधला आहे. “शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि आता पार्थ पवार या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. भाजपात सर्वसामान्य नागरिकाला संधी मिळते. बारामतीच्या पवारांची बेनामी संपत्ती जप्त केली, तर महाराष्ट्रावरील साडे पाच लाख कोटींचे कर्ज संपून जाईल,” अशा शब्दांत जयकुमार गोरे यांनी हल्लाबोल केला आहे. एका मराठी वाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here