Boys 3 Rakes In Crores Over Weekend The Fourth Episode Will Be Released Soon

0
3


Boyz 3 : बॉईज सीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर या त्रिकूटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. बॉईज सीरिजमधला नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘बॉईज 3’ (Boyz 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अल्पावधीतच या सिनेमाने बॉक्स ऑफिवर जादू दाखवली आहे. 

‘बॉईज 3’ हा मराठी सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्या वीकेंडला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 3.05 कोटींचा गल्ला जमवला आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर ‘हॉऊसफ़ुल्ल’चा बोर्ड झळकत आहे. टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत प्रेक्षक या सिनेमाचा आनंद घेत आहेत. 

धैर्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाला किर्तीने दिलेली साथ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या सिनेमाला पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावरदेखील ‘बॉईज 3’ची हवा आहे. ‘बॉईज’ सीरिजला प्रेक्षकांचे प्रेम मिळत असल्याने आता ‘बॉईज 3’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


‘बॉईज 3’च्या यशाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले आहेत की,” ‘बॉईज 1’ आणि ‘बॉईज 2’ नंतर प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणे आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मात्र यासाठी सिनेमाच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली. ‘बॉईज 3’ला प्रेक्षकांचा मिळणारा हा सकारात्मक प्रतिसाद पाहाता, आमच्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळात आहे. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या या प्रेमामुळेच आम्ही ‘बॉईज 4’ची या सिनेमात घोषणाही केली आहे. त्यामुळे आता ही धमाल चौपट होणार आहे.

संबंधित बातम्या

Boyz 3 : मराठीचा माज बेळगावात नाही तर मग कुठे करायचा?…; ‘बॉईज 3’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

Boxoffice Movies : वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बॉक्स ऑफिसवर आहे मराठी सिनेमांचा दबदबाLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here