C Voter Survey Who Will Give Competition To Pm Modi In The 2024 Elections Watch The Survey Of Abp News

0
5


C Voter Survey : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.  देशातील राजकीय घडामोडीवर एबीपी न्यूजनं देशाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. सी व्होटरच्या सर्व्हेच्या मदतीनं देशातील जनतेचा काय कौल आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  पंतप्रधान नरेंद्र समरकंदवरुन एससीओ परिषदेवरुन परतल्यानंतर, ज्ञानव्यापी प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर, प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्या भेटीनंतर एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं सर्व्हे केला आहे.  या सर्व्हेमध्ये 3698 जणांसोबत बातचीत केली आहे. यामध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 (+ – 3) ते 5 (+ – 5) इतका असू शकतो. 

आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड ते दोन वर्षांचा कालावधी आहे. पण देशातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप, काँग्रेस अथवा इतर पक्षांनी तयारी सुरु केली आहे.  त्यामुळे एबीपी न्यूजनं विविध प्रश्न विचारत देशाचा मूड काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहूयात देशाचा कौल काय आहे?

देशातील विरोधी पक्षाला कोण जोडणार?
ममता बॅनर्जीपासून केजरीवालपर्यंत आणि केसीआरपासून नितीशकुमार सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. हे सर्वच नेते विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची तयारी करत आहेत. तशापद्धतीच्या बैठकी भेटीगाठीही झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर देशातील विरोधी पक्षाला कोण जोडणार? असा प्रश्न निर्माण झालाय. 

एलएसीवर भारत आणि चीनच्या सैनिकांनी माघार घेतल्यानंतर भारताच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला का? 
विश्वसार्हता वाढली – 51 टक्के
विश्वसार्हता घटली –  29 टक्के
विश्वसार्हतेवर कोणताही परिणाम नाही –  20 टक्के

पाचवी मोठी अर्थव्यवस्था आणि जागतिक मुद्द्यावर तटस्थ भूमिकेमुळे भारत जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे का? 
हो – 64 टक्के
नाही – 36 टक्के

2024 लोकसभा निवडणुकीत विरोधीपक्षाकडून पंतप्रधान पदासाठी कोणता उमेदवार असेल?
राहुल गांधी – 23 टक्के
अरविंद केजरीवाल – 18 टक्के
ममता बॅनर्जी – 6 टक्के 
केसीआर – 2 टक्के
अन्य – 10 टक्के
कोणत्याही नावावर सहमती होणार नाही – 29 टक्के

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचे दावेदार असतील, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. राहुल गांधी यांना 23 टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे. तर 18 टक्केंनी अरविंद केजरीवाल यांच्या पारड्यात मते टाकली आहेत. 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत आयोध्या-काशी-मथुरा मुद्द्याचा परिणाम होईल का?
हो – 59 टक्के
नाही – 41 टक्के

ज्ञानवापी आणि मदरसा यांच्यावरील सर्व्हेवर ओवेसींचं वक्तव्य प्रक्षोभक होतं का?

हो – 70 टक्के
नाही – 30 टक्के

आरएसएसच्या वेशभूषेवर भाष्य करत काँग्रेसनं तिरस्काराचं राजकारण केले का?

हो – 40 टक्के
नाही – 40 टक्के

राहुल गांधींच्या कामकाजावर संतुष्ट आहात का?
तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रादरम्यान 11 सप्टेंबर रोजी 63 टक्के जणांनी राहुल गांधींच्या कामकाजावर संतुष्ट असल्याचं सांगितलं. तर याआधी सहा सप्टेंबर रोजी 59 टक्के जणांनी संतुष्ट असल्याचं सांगितलं. एका आठवड्यात राहुल गांधींच्या बाजूनं मत करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिसून आले. 

तामिळनाडूमध्ये किती जण असंतुष्ट? 
सहा सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील 25 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या कामकाजावर असंतुष्ट असल्याचं सांगितलं. तर 11 सप्टेंबर रोजी 22 टक्के जणांनी असंतुष्ट असल्याचं सांगितलं. म्हणजेच, गेल्या आठवड्याच्या तुलनेत असुंष्ट लोकांची संख्या कमी झाल्याचं दिसले. याच प्रश्नवर सहा सप्टेंबर रोजी 16 टक्के जणांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं तर 11 सप्टेंबर रोजी 15 टक्के लोकांना सांगू शकत नाही, असे उत्तर दिलेय. 

केरळमधील काय स्थिती?
राहुल गांधी यांच्या कामकाजावर संतुष्ट आहात का? यासंदर्भात केरळमधील लोकांनीही आपली प्रतिक्रिया दिली.  10 सप्टेंबर रोजी केरळमधील 56 टक्के जण संतुष्ट होते. तर 14 सप्टेंबर रोजी संतुष्ट लोकांची संख्या वाढून 60 टक्के झाली. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु होण्याआधी आणि यात्रा सुरु झाल्यानंतरचा वरील डेटा आहे. 10 सप्टेंबर रोजी 31 टक्के जण राहुल गांधींच्या कामकाजावर असंतुष्ट होते. तर 14 सप्टेंबर रोजी ही संख्या 30 टक्के झाली. 

एकूणच सारांश असा की, भारत जोडो यात्रामुळे राहुल गांधी यांना राजकीय फायदा झाला आहे.  

आरजेडीसोबत आघाडी आणि बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीचा नितीशकुमार यांच्या प्रतिमेला धक्का बसलाय का?

खराब झाली का? – 54 टक्के
चांगली झाली – 26 टक्के
कोणताच परिणाम झाला नाही? 20 टक्के

नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा प्रशांत किशोर यांना जायला हवं का?
होय – टक्के
नाही – 49 टक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here