chacha raosaheb tanpure, चाचा, भाजपात या, विखे-कर्डिलेंची विनंती; तनपुरे हसत म्हणाले, मी तुमचाच आहे – maharashtra politics news ahmednagar rahuri radhakrishna vikhe patil shivaji kardile invites chacha raosaheb tanpure to join bjp

0
0


अहमदनगर : “चाचा” भाजपत या, भाजपचे उपरणे गळ्यात घाला, अशी विनंती माजी आमदार शिवाजी कर्डिले, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी पालिकेच्या निवडणुकीतील विरोधकांचे नेतृत्व, तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे उर्फ चाचा यांना केली. मात्र “मी तुमचाच आहे” असे प्रांजळपणे सांगत तनपुरेंनी स्मितहास्य केलं आणि हात जोडून भाजप प्रवेशाला विनम्र नकार दिला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील. स्थानिक आघाड्यांच्या नावावर निवडणूक लढवली जाणार नाही, असं स्पष्ट केलं. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, राहुरी नगरपालिकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविली जाईल, असे मुंढेंनी जाहीर केले. ‘सरकारनामा’ वेबसाईटवर यासंबंधी बातमी देण्यात आली आहे.

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणात चाचांना भाजपा प्रवेशाचा आग्रह केला. यापूर्वी विकास मंडळाच्या नावाखाली राहुरी पालिकेची निवडणूक लढवली जात होती. आता भाजपच्या चिन्हावर लढवली जाणार आहे. किती दिवस खाट्या गायीचे दूध काढणार. आता दुभत्या गायीचे दूध काढा, असं म्हणत कर्डिलेंनी चाचा तनपुरेंना भाजप प्रवेशाचे आवताण दिले.

हेही वाचा : गुलाबराव पाटील काय हिंदुत्ववादी होणार, फायद्यासाठी शिंदेंनाच ‘आजा’ बनवलं

दुसरीकडे, ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीशी स्थानिक पातळीवर आघाड्या केल्या. त्याचा फटका भाजप कार्यकर्त्यांना बसला. भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. भाजप नेत्यांवर कार्यकर्त्यांनी निष्ठा ठेवावी, असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पुढील निवडणुका भाजप पक्षाच्या चिन्हावर होणार आहेत. राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे चाचा आजच भाजपात प्रवेश करा, असा आग्रह धरला. परंतु तनपुरेंनी प्रत्येकाला स्माईल देत फक्त हात जोडले. तनपुरेंच्या मनात नेमकं काय चाललंय, याची कुजबूज रंगली होती.

हेही वाचा : ‘शिवतीर्थ’वर मोदींचा आवाज घुमणार; मुनगंटीवारांकडून राज ठाकरेंना खास गिफ्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here