cheetah name, भारतात आणलेले अफ्रिकन चित्ते ‘या’ नावांनी ओळखले जाणार; पंतप्रधान मोदींनीही सुचवलंय एक नाव – pm modi names one cheetah asha, other big cats have been christened too

0
6


मध्य प्रदेशः सुमारे ७० वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेले चित्ते शनिवारी पुन्हा एकदा भारतात दाखल झाले. नामिबिया देशातून शनिवारी सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी आठ चित्ते ग्वाल्हेरच्या हवाई तळावर दाखल झाले. तेथून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळील पालपूर येथे नेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यातील तीन चित्ते जंगलात त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षात सोडले. आता या आठ चित्त्यांचे नामकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका चित्त्यांसाठी खास नाव सुचवले आहे.

नामिबियातून शुकवारी रात्री खास तयार करण्यात आलेल्या लाकडी पेटीतून १० तासांचा प्रवास करत चित्ते भारतात दाखल झाले. तर हवाई तळावरील कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी त्यांना हेलिकॉप्टरमधून नेऊन त्यांचा राष्ट्रीय उद्यानापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. संपूर्ण प्रवासामध्ये चित्त्यांना खाण्यास काहीही देण्यात आले नव्हते. राष्ट्रीय उद्यानात आणल्यानंतरच त्यांची व्यवस्था करण्यात आल होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी तीन चित्त्यांना पिंजऱ्यातून मुक्त केले. तर त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अन्य चित्त्यांना जंगलातील कक्षात सोडले.

वाचाः ७० वर्षांनंतर चित्ता भारतात; ‘या’ राजाने केली होती देशातल्या शेवटच्या चित्त्याची शिकार

चित्त्यांना त्यांच्या अधिवासात सोडल्यानंतर सुरुवातलीला ते थोडे विचलित झाल्याचं जाणवलं मात्र, त्यांचा व्यवहार व वागणं सकारात्मक होतं. आता या आठही चित्त्यांची नावं ठेवण्यात आलं आहे. ओबान, फ्रेडी, सावन्नाह, अशा, सिबली, सैसा आणि साशा असं त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. त्यातील ‘आशा’ हे मादी चित्त्याचं नाव पंतप्रधान मोदी यांनी ठेवलं आहे. तर, इतर चित्त्यांची नाव नामीबिया येथेच ठेवण्यात आली होती.

वाचाः ना वाघांप्रमाणे डरकाळी, ना सिंहांसारखी गर्जना; चित्त्यांचा आवाज ऐकलात का? पाहा VIDEO

चित्त्यांवरून मोदींवर टीका

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी ट्विटरवर एक पत्र शेअर करून त्यांनी सन २००९मध्ये ‘प्रोजेक्ट चित्ता’ सुरू केल्याचा दावा केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्ता भारतात आणण्यासाठी पूर्वीच्या सरकारांनी विधायक प्रयत्न केले नसल्याच्या आरोपांवर ते ‘विकृत खोटारडे’ असल्याचे म्हटले. ‘हे ते पत्र आहे ज्याद्वारे सन २००९मध्ये ‘प्रोजेक्ट चित्ता’ सुरू झाला होता. आपले पंतप्रधान विकृत खोटे बोलणारे आहेत. मी ‘भारत जोडो यात्रे’मध्ये व्यग्र असल्याने मला काल हे पत्र देता आले नाही,’ असे रमेश यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटसोबत त्यांनी तत्कालीन पर्यावरण आणि वनमंत्री म्हणून सन २००९मध्ये वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे एम. के. रणजितसिंग यांना लिहिलेले पत्रही शेअर केले.

वाचाः मोदींच्या वाढदिवशी भारतात आलेले परदेशी चित्ते मध्य प्रदेशातच का राहणार? वाचा रंजक कारणं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here