Congress President Congress Power In Rajasthan Be At Stake In The Presidential Election

0
7


Congress President Election:  एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress) धामधूम सुरु झाली आहे तर दुसरीकडे त्याचा एक मोठा साईड इफेक्ट राजस्थानातल्या काँग्रेसच्या सत्तेवर होण्याची शक्यता आहे. कारण अशोक गहलोत यांच्या अध्यक्ष बनण्यामुळे राजस्थानची कमान कुणाकडे सोपवायची याचा निर्णय हायकमांडला करावा लागणार आहे. आणि तो प्रश्न नीट हाताळला नाही तर संभाव्य संघर्षाची बीजं रोवली जाण्याची शक्यता आहे. 

गहलोतांच्या दिल्लीत जाण्यानं राजस्थानात काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस सत्ता असलेलं एक राज्य पणाला लावणार का? जी चूक पंजाबात झाली ती आता राजस्थानात होणार का? काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत रिंगणात उतरणार म्हटल्यानंतर याही प्रश्नांची चर्चा सुरु झालीय. कारण गहलोतांच्या दिल्लीत जाण्यानंच राजस्थानातल्या काँग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. 

गहलोत अध्यक्ष झाले तर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण?

गहलोत अध्यक्ष झाले तर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? हा सगळ्यात महत्वाचा सवाल आहे. गहलोतांची इच्छा आहे आपलाच माणूस तिथं बसावा. तर सचिन पायलट यांचं एक बंड मागच्या दोन वर्षांपूर्वी होता होता राहिलं आहे. आता पुन्हा डावललं तर त्यांची नाराजी कुठल्या टोकापर्यंत जाते हे पाहावं लागेल.  राजस्थानात 2023 च्या डिसेंबर महिन्यात निवडणुका अपेक्षित आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुकाच्या अगदी सहा महिने आधीच ही निवडणूक असेल. हातात असलेली राज्यं वाचवणं हे काँग्रेससमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण राजस्थानची घडी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे विस्कटण्याची भीती आहे. 

बेभरवशी निर्णयांमुळे काँग्रेसमुक्तीकडे वाटचाल?
पंजाब हे काँग्रेसचा मजबूत पाया असलेलं राज्य, पण कॅप्टन अमरिंदर-सिद्धु-चन्नी अशी अंतर्गत लढाईच निर्माण होऊन काँग्रेसनं तिथं आपला संधी दिली
छत्तीसगढमध्येही भूपेश बघेल- टी ए सिंह देव यांच्यात खुर्चीचा संघर्ष सुरु आहे
आता राजस्थानातही गहलोत विरुद्ध पायलट संघर्षाचा पुढचा अंक दिसू शकतो
मागच्या निवडणुकीवेळी सचिन पायलट प्रदेशाध्यक्ष होते, पण आमदारांचा पाठिंबा असल्यानं अशोक गहलोत यांनाच मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली
जून 2020 मध्ये पायलट आणि काही आमदार नाराज होऊन रिसॉर्टवर पोहचले होते, पण ते बंड शांत करण्यात गहलोत यशस्वी झाले
आताही मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं तर आपल्या मर्जीतले सीपी जोशी यांनाच पद मिळावं अशी गहलोतांची इच्छा आहे, तसं झालं तर पायलट यांच्या धुसफुशीची वात पुन्हा पेटणार का 

अध्यक्षपद स्वीकारण्याची गहलोतांची फारशी इच्छा नाहीय आणि हे पद स्वीकारतानाच मुख्यमंत्रीपदही स्वताकडे ठेवायचाच त्यांचा प्रयत्न होता. परवा सोनिया गांधींना भेटल्यानंतर एक व्यक्ती, एक पद हे सूत्र सरकार आणि संघटना अशी दोन वेगळी पदं असतील तर लागू होत नाही हेच सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण काल राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत इशारा दिला की या सूत्राचं पालन हे व्हायलाच हवं. त्यानंतर गहलोतांचा सूर बदलला. 

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत हे 26 सप्टेंबरला अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्याच्या आसपासच राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचं काय होणार याचाही फैसला होईल. एकीकडे देशात काँग्रेसचे आता केवळ दोनच मुख्यमंत्री उरलेत. त्यात राजस्थानसारखं एक महत्वाचं राज्य काँग्रेसनं अंतर्गत लढाई गमावू नये म्हणजे झालं.  

इतर महत्वाच्या बातम्या

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून गांधी कुटुंबीय दूर का? दिग्विजय सिंह म्हणाले…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here