Gold Silver Price Today on 21 September 2022 sc

0
2


Gold Silver Price on 21 September 2022: सध्या महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या काळात सोने-चांदीचे (Gold Silver rate ) खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. या काळात तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold ornaments) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी (Important news) आहे. (Gold Silver Price Today on 21 September 2022)

सोन्याच्या दरात सतत चढ-उतार दिसून येत आहे. आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी देशात सोन्याच्या किमतीने झेप घेतली आहे. सराफा बाजारात (bullion market) आज सोन्याच्या दरात 100 रुपयांनी तर चांदीच्या दरात 500 रुपयांनी बदल झालेला आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,940 आहे, आदल्या दिवशी ही किंमत 45,850 रुपये होती. म्हणजेच 100 रुपये प्रति 10 ग्रॅमची उडी. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीची सरासरी किंमत 57,200 रुपये प्रति किलो झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर

चेन्नई        : 46,300 (22 carats), 50,150 (24 carats)

मुंबई         : 45,950 (22 carats), 50,130 (24 carats)

दिल्ली       : 46,100 (22 carats), 50,290 (24 carats)

कोलकाता : 45,950 (22 carats), 50,130 (24 carats)

जयपूर       : 46,100 (22 carats), 50,290 (24 carats)

लखनऊ    : 46,100 (22 carats), 50,290 (24 carats)

पाटणा      : 45,980 (22 carats), 50,130 (24 carats)

पुणे          :45,980 (22 carats), 50,130 (24 carats)

नागपूर    :  45,980 (22 carats), 50,130 (24 carats)

नाशिक   :  45,980 (22 carats), 50,130 (24 carats)  

वाचा :Raju Srivastav यांनी अर्ध्यात सोडली पत्नीची साथ, जिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रीही फिक्या; पाहा Photo

चांदीची आजची किंमत

आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. आज सरासरी किंमत 57,200 रुपये प्रति किलो आहे. प्रमुख शहरांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि पटना मध्येही किंमत 57,200 रुपये प्रति किलो आहे तर चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, विजयवाडा इत्यादी दक्षिणेकडील शहरांमध्ये किंमत 61,800 रुपये प्रति किलो आहे. LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here