Health Tips Stomach Burning Frequently These Treatment Will Bring Relief

0
6


How To Stop Stomach Burning: सध्या धावपळीच्या युगात आपलं आरोग्याकडे फारसं लक्ष नसतं. पण यामुळे भविष्यात आजारांना निमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी योग्य पद्धतीने पाळणं आवश्यक आहे. जर तुमचा आहार व्यवस्थित (Diat Plan) नसेल तर प्रकृती साथ देत नाही. अनेकदा चुकीच्या सवयींमुळे पोटात आणि घशात जळजळ होते. छातीत कायम दुखत (Pain In Chest) राहतं. कधी कधी पोटातील गॅस (Stomach Gas) वाढला की सहन करणं अशक्य होतं. यासाठी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. 

पोटात जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल हे एक मोठे कारण आहे. यासोबतच लठ्ठपणा हे देखील जळजळ होण्याचे कारण असू शकते. अस्थमाच्या रूग्णांमध्ये असे दिसून येते की, त्यांच्या पोटात जळजळ होत असल्याची तक्रार ते वारंवार करतात. दम्यामध्ये घेतलेल्या औषधामुळे जास्त जळजळ होते, हे फार कमी लोकांना माहीत असेल.

या आजारांवरील औषधांमुळेही जळजळ होते 

आजकाल लोक अ‍ॅलर्जी, झोप, नैराश्य, गर्भनिरोधक आणि अनियमित मासिक पाळी अशा विविध आजारांनी ग्रस्त आहे. अशा अनेक आजारांवरची औषधेही पोटात जळजळ करतात. यामुळे घसा आणि छातीत जळजळ देखील करतात.

उपचार कसे करावे?

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पोटाच्या जळजळीसाठी खूप प्रभावी आहे. तुम्हाला 2 चमचे व्हिनेगर एक कप पाण्यात विरघळवून प्यावे लागेल. यावर आणखी एक चांगला उपचार म्हणजे 1 चमचा लिंबाचा रस 1 ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लिंबूमध्ये अल्सरविरोधी गुणधर्म देखील आहेत. अल्सरविरूद्ध चांगले परिणाम दर्शवतात.

(Disclaimer: दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी, कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here