hosori sound, लातूरमधील जमिनीतून येणारे गूढ आवाज कशाचे? दिल्लीहून तज्ज्ञ दाखल, अखेर गुपित उलगडलं – latur hasori myrical sound myth revealed by team of delhi and said it is sound of earthquake

0
4


लातूर : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात असणाऱ्या हासोरी या गावात आज पहाटे ३ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून याची तीव्रता २.३ रिश्टर स्केलची होती. तर यापूर्वी भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले आहेत. अशी माहिती राष्ट्रीय पृथ्वी मंत्रायलाचे भूवैज्ञानिक अजयकुमार शर्मा यांनी दिली आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून या परिसरात जमिनीतून जे गूढ आवाज येत होते त्याचेही रहस्य उलगडले असून या अवजमागे भूकंपाचे सौम्य धक्के हेच कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे धक्के सौम्य आहेत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नसले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून हासोरी परिसरात जमिनीतून गूढ आवाज येत होते त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. हे आवाज नेमके कशामुळे येत आहेत हे स्पष्ट होत नव्हते. मात्र, भूगर्भातील हालचालीमुळे हे आवाज येत असावेत असा अंदाज लावला जात होता. मात्र, येथील भूकंप मापन केंद्राकडे भूकंपाची कुठलीही नोंद नव्हती. त्यामुळे या आवाजाचे गूढ उकलण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशाळा संकुल यांची एक टीम हासोरीमध्ये पोहोचली होती.

पाचशे रुपयांवरून वाद; बायकोसोबत मस्करीची कुस्करी; विरारमध्ये तरुणाने जीव गमावला

काल दिल्लीहून एक टीम हासोरीत दाखल झाली. त्यांनी या परिसराचा अभ्यास केला आहे. हासोरी, औराद शहाजानी आणि आशिव येथे भूकंप मापन यंत्र बसविण्यात आले आहे. हासोरी व परिसरात 12 सप्टेंबर रोजी २.२, १५ सप्टेंबर रोजी १.३ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप झाला जाणवले तर आज २३ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून ३८ मिनिटांनी २ रिश्टर स्केलचा भूकंप झाला असल्याची नोंद झाली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हासोरी परिसरात जमिनीखाली ५ किमी अंतरावर असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र संकुलाचे प्रमुख प्रा. अविनाश कदम यांनी सांगितले.

राज्याच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारीया सर्व बाबीं लक्षात घेऊन या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून नागरिकांना सुरक्षेसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी दिली.

कालपर्यंत शिंदे म्हणत होते, दसरा मेळाव्याबाबत लवकरच कळेल, आज म्हणतात, ‘मी त्यावर…’

आम्हाला नाटकं जमत नाही; भाजप सोबतच्या युतीबाबत संदीप देशपांडेंचं सडेतोड उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here