How to get rid of Cockroach Mosquito Fly home remedies

0
1


How to get rid of Cockroach Mosquito Fly: राहतं घर स्वच्छ असावं, असं प्रच्येकालाच वाटतं. पण, अनेकदा असं होतं की कितीही प्रयत्न केले अगदी जीवाचा आटापिटा केला तरी घर वरून चकचकीत दिसलं. कानाकोपऱ्यात मात्र दडून बसलेली झुरळं, चिलटं, माशा मात्र घरातून काही केल्या बाहेर जात नाहीत. माशा- मच्छर (Mosquito-fly) घरात भिरभिरताना दिसल्यास अनेकदा तळपायाची आग मस्तकात जाते. जेवताना त्यांची भुणभूण कानांवर आली तरी अनेकजण तावातावानं उठून त्यांचा खात्मा करण्यासाठी पुढे सरसावतात. (How to get rid of Cockroach Mosquito Fly home remedies)

असंख्य स्प्रे, पावडर आणि कित्येक प्रयत्न करुनही ही समस्या काही दूर होत नाही. पण, आता याच प्रयत्नांना पूर्णविराम देण्यासाठी एक असा स्प्रे तयार करण्यात आला आहे जे हा उच्छाद समूळ नष्ट करु शकणार आहे. 

स्प्रे बनवण्यासाठी काय करावं? 

घरातील झुरळ  (Cockroach), मच्छर पळवण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या, त्यामध्ये लसणाची भरपूर सालं (Garlic), मिर्चीची देठं आणि कोरफडीचं (alovera) एक पातं टाका. आता हे मिश्रण झाकून ठेवा. तीन दिवस ते तसंच राहूद्या. चौथ्या दिवशी पाण्यातील सर्व गोष्टी बारीक वाटून घ्या आणि त्याच पाण्यात मिसळा. तुमचा किटकनाशक स्प्रे घरच्या घरी तयार. 

काय काळजी घ्यावी? 
स्प्रे तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यातून दुर्गंधी येऊ शतते. त्यासाठी हे पाणी असणारं भांडं स्वयंपाकघर (Kitchen) किंवा बेडरूममध्ये ठेवू नका. ते भांडं अशा ठिकाणी ठेवा जिथं कुटुंबीयांची ये-जा तुलनेनं कमी असेल. भांड्याचं झाकण 3 दिवस घट्ट बंद करून ठेवा. त्यानंतर ते उघडा. 

 

कसा वापरावा स्प्रे? 
वरील संपूर्ण प्रक्रिया वापरून तयार करण्यात आलेला स्प्रे झुरळं, मच्छर आणि माशा घोंगावत असणाऱ्या  जागांवर 2-3 वेळा फवारा. घरात काही ठिकाणी पाण्याचा अंश भींतीतून येत असल्यास तिथंही हा स्प्रे मारा. ज्यामुळं किडे- किटक पूर्णपणे नष्ट होतील. 

(वरील माहिती घरगुती उपाय आणि संदर्भांच्या आघारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here