ind vs aus, भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची मोठी चाल, विजयासाठी आखला जबरदस्त प्लॅन – ind vs aus : australia’s big move before the 1st t 20 match against india in mohali, a great plan for victory

0
4


मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाने आता एक मोठी चाल खेळली आहे. आज ऑस्ट्रेलियाच्या संघाने काही तास सराव केला आणि त्यामध्ये एक जबरदस्त प्लॅन त्यांननी पहिल्या सामन्याच्या विजयासाठी बनवला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने यावेळी कोणती मोठी चाल खेळली आहे, जाणून घ्या…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना मंगळवारी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी, भारतीय फिरकीपटूंना तोंड देण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने सोमवारी पीसीए स्टेडियमवर विशेष रणनीतीचा सराव केला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सामन्याच्या तयारीसाठी संघाच्या चार फलंदाज आणि फिरकीपटूंनी सराव सत्रात सराव केला. संघाचा कर्णधार आरोन फिंचने मोहालीच्या स्थानिक फिरकीपटूंवर चांगली फटकेबाजी केली. यासह, संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने नेटमध्ये ४५ मिनिटे फलंदाजीचा सराव केला, त्यादरम्यान त्याने मोहालीच्या स्थानिक वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंवर फटकेबाजीचा सराव केला. यामध्ये त्याने जास्तीत जास्त फिरकी गोलंदाजीवर सराव करण्यावर जास्त भर दिला. कारण भारताच्या खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला पोषक असतात. त्याचबरोबर भारताने यावेळी आपल्या संघात चार फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे. त्यामुळे या मालिकेत भारताची मदार ही फिरकी गोलंदाजीवर असणार आहे. भारताचे हे आव्हान मोडीत काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आता फिरकी गोलंदाजीवर प्रहार करण्याचे ठरवले आहे.

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पानेही सामन्यापूर्वी बराच वेळ सराव केला. झाम्पाने प्रथम आपला कर्णधार आरोन फिंच आणि टीम डेव्हिड यांच्या समोर गोलंदाजी केली. यादरम्यान झाम्पाने दोन्ही फलंदाजांना अनेकदा चमकवल्याचे पाहायला मिळाले. झाम्पाने त्यानंतर फलंदाजीतही हात आजमावला आणि लांबलचक फटके मारले. त्यामुळे मोहालीतील हा सामना फिरकी गोलंदाजांसाठी महत्वाचा ठरेल, असे दिसत आहे. त्यामुळे या सामन्यात फिरकी गोलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर फिरकीचा सामना करण्यात फलंदाज किती यशस्वी ठरतात, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here