ind vs aus 2nd t 20 weather report, IND vs AUS : पावसामुळे दोन्ही संघांचा सराव झाला रद्द, दुसरा सामना होणार की नाही जाणून घ्या… – ind vs aus 2nd t 20 : practice of both teams canceled today due to rain in nagpur, know whether second t20 match will be held or not

0
6


नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाऊस हा व्हिलन ठरू शकतो, असे पाहायला मिळत आहे. कारण गुरुवारी नागपूरमध्ये जोरदार पाऊस पडला. हा पाऊस एवढा जोरदार होता की, दोन्ही संघांना आपला आजचा सराव रद्द करावा लागला. त्यामुळे उद्या पाऊस पडणार की नाही आणि त्यामुळे सामना रद्द होऊ शकतो का, याची माहिती आता समोर आली आहे.

नागपूरच्या मैदानावर शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात संततधार पाऊस सुरू आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी यामुळे नाराज आहेत, कारण सामन्याच्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ४५, ००० क्षमतेच्या स्टेडियमवरील सामन्याची तिकिटे आधीच विकली गेली आहेत. त्यामुळे चाहत्यांनी या सामन्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पावसामुळे चाहत्यांचा विचका होऊ शकतो, असे म्हटले जात असल्यामुळे नागपूरच्या क्रिकेट संघटनेमध्ये नाराजी आहे.

बुधवारी दुपारी दोन्ही संघ ऑरेंज सिटीत दाखल झाले, मात्र सायंकाळनंतर अधूनमधून पाऊस पडला. गुरुवारी पहाटे पाऊस पडला. त्यानंतर सकाळी १०च्या सुमारास पाऊस थांबला असला, पण शहरावर दाट ढगांचे आच्छादन आहे म्हणजे पावसाचा धोका या सामन्यावर असेल. सकाळच्या पावसामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांना त्यांचे दुपार आणि संध्याकाळचे नियोजित सराव सत्र रद्द करावे लागले. पावसामुळे खेळाडूंना स्टेडियममध्ये जाता आले नाही. नागपूरमध्ये उद्याही पावसाची शक्यता आहे, पण सामना रद्द होईल एवढा जोरदार पाऊस मात्र नसेल, असे म्हटले जात आहे.

खेळपट्टी तयार करणाऱ्या क्युरेटर आणि मैदानातील कर्मचाऱ्यांनी दुपारच्या सुमारास तपासण्यासाठी कव्हर काढले, पण रिमझिम पावसाच्या धोक्यामुळे त्यांना लवकरच कव्हर परत ठेवावे लागले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते सुपर सपर चालवत आहेत. तसेच शुक्रवारी पाऊस पडणार नाही या आशेवर नागपूरचे चाहते आहेत. नागपूरमध्ये तीन वर्षांत पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयोजित होत आहे आणि चाहत्यांनी काही मिनिटांत ऑनलाइन तिकीट खरेदी केली आहे. तरीही शहरातील व्हीसीएच्या ऑफिसमध्ये लोक अजूनही तिकीट ऑफलाइन उपलब्ध आहेत का ते विचारत आहेत. स्टेडियम शहरापासून २० किमीपेक्षा जास्त अंतरावर आहे आणि व्हीसीएला स्वतःची वाहने घेऊन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे एवढा आटापिटा करून चाहते स्टेडियमवर पोहोचतील, पण पावसामुळे सामना रद्द होऊ नये, हीच इच्छा प्रत्येक चाहत्याच्या मनात असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here