IND vs AUS Time, भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सामने ७.३० वाजता नाही तर कधी सुरु होणार, BCCI ने दिली माहिती – t 20 matches between india and australia will start at 7.30 if not earlier, know the right time

0
2


मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार असल्याची माहिती यावेळी समोर आली होती. पण आता या मालिकेतील सामन्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे सामने आता संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार नाही. हे सामने आता लवकर सुरु होतील.

बीसीसीआयने आता आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली आहे, या पोस्टमध्ये हे सामने नेमके कधी सुरु होतील याबाबतची माहिती देण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रत्येक सामन्याचा टॉस हा आता संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. टॉसनंतर दोन्ही संघ आपले संघ जाहीर करतील. टॉस झाल्यावर अर्ध्या तासाने सामना सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या मालिकेतील सामने हे संध्याकाळी ७.०० वाजता सुरु करण्यात येणार आहेत.

bcci


पहिल्या सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी, जाणून घ्या…
मोहालीच्या मैदानात आतापर्यंत भारताने बरेच सामने जिंकले आहेत. पण काळानुरुप मोहालीच्या मैदानाची खेळपट्टी बदलली आहे. यापूर्वी मोहालीची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी पोषक समजली जायची. पण कालांतराने खेळपट्टीमध्ये बदल झाला आणि आता या खेळपट्टीवर चांगल्या धावाही होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण तरीही या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत असते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगली मदत मिळू शकते. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीची काही षटकं ही वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे या सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाज लवकर विकेट्स मिळवू शकतात. पण कालांतराने चेंडू जसा जुना होत जाईल, तशी ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पोषक ठरू शकते.

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ :
ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here