India vs Australia t 20 series timing, IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे सामने किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ… – ind vs aus : what time will india and australia matches start, know the right time…

0
5


नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत तीन ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. पण या मालिकेतील सामने नेमके किती वाजता सुरु होतील, याची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना हा मंगळवारी २० सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना हा शुक्रवारी २३ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा व मालिकेतील अखेरचा सामना हा रविवारी २५ सप्टेंबरला होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेतील टॉस हा संध्याकाळी ७.०० वाजता होणार आहे. यावेळी दोन्ही कर्णधार येतील आणि टॉस झाल्यावर दोघेबी आपला संघ जाहीर करतील. त्यानंतर अर्ध्या तासाने हा सामना सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हे तिन्ही सामने संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सुरु होणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ही ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्वाची आहे. टी २० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी वर्ल्डकपचा यजमान संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत घरच्या मैदानावर तीन दिवसीय टी २० मालिका खेळणार आहे. हे सामने विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी एक प्रकारे सराव असेल. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो. हा खेळाडू जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियासमोर खेळतो तेव्हा तो ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दाणादाण उडवतो. टीम इंडियाचा घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत समावेश करण्यात आला आहे. काही काळापासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर होता. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी मोठी अडचण ठरणार आहे. त्याचा एक विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम आहे.

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ :
ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here