Instagram Down Users Complain Unable To Post, Share Images Social Media

0
6


Instagram Down : सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) मागील काही वेळापासून डाऊन झाले आहे. अनेक इन्स्टाग्राम युजर्सनी ट्वीट करत याबाबत तक्रार केली असून नाराजी व्यक्त केली आहे. 

इन्स्टाग्रामच्या काही युजर्सला पोस्ट करण्यात अडचणी येत आहेत. इन्स्टाग्रामनेही ट्वीट करत इन्स्टाग्राम वापरताना युजर्सला अडणी येत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, इन्स्टाग्राम वापराताना काही युजर्सला अडचणी येत आहेत. आम्ही त्यावर काम करत आहे. लवकरच इन्स्टाग्राम पूर्वरत होईल. युजर्सला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. 

इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याची तक्रार केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी मिम्स शेअर करत खिल्ली उडवली आहे. काही युजर्सला इन्स्टाग्राम लॉगइन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही युजर्सला पोस्ट करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या ट्वीटरवर #instagramdown हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. या हॅशटॅगचा वापर करुन अनेक नेटकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, इन्स्टाग्राम डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे. LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here