lava blaze pro, Lava Blaze Pro : बेस्ट फीचर्सचा लावाचा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत-फीचर्स पाहा – lava blaze pro launched in india with 50mp camera and 5000mah battery

0
3


नवी दिल्लीः lava blaze pro price : देसी कंपनी Lava ने आपल्या Blaze Series चा दुसरा स्मार्टफोन Lava Blaze Pro लाँच केला आहे. Lava ने याच वर्षी जुलै महिन्यात लावा ब्लेज स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने आज Lava Blaze Pro ला लाँच केले असून कंपनीने यावेळी अभिनेता कार्तिक आर्यनला आपला ब्रँड अम्बेसिडर सुद्धा बनवले असल्याची घोषणा केली आहे. लावाने Lava Blaze Pro मध्ये कंपनीने ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि 5000mAh ची मोठी बॅटरी या सारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स सविस्तर जाणून घ्या.

Lava Blaze Pro ची किंमत
Lava Blaze Pro स्मार्टफोनमध्ये देशात १० हजार ४९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनला फ्लिपकार्ट आणि लावाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. लावाचा हा फोन ग्लास गोल्ड, ग्लास ग्रीन, ग्लास ब्लू आणि ग्लास ऑरेंज कलर मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. लावाने आपल्या या नवीन फोन सोबत ‘free service at home’सर्विस सुद्धा ऑफर केली आहे. या सर्विस अंतर्गत फोनमध्ये काहीही खराबी आल्यास डोरस्टेप सर्विस ग्राहकांना मिळणार आहे.
याशिवाय, लावाने वॉरंटी पीरियड दरम्यान स्क्रीन फुटल्यानंतर फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट सर्विस सुद्धा दिली आहे. कंपनी ब्रँड न्यू प्री सेल एक्सपीरियन्ससाठी ‘Demo at home’ देत आहे. या अंतर्गत ग्राहक घर किंवा आपल्या सुविधेसाठी अन्य लोकेशनवर लावा ब्लेज प्रोचे फर्स्ट हँड एक्सपीरियन्स घेवू शकतात.

Lava Blaze Pro चे स्पेसिफिकेशन्स
लावाच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन (1600 × 720 पिक्सल) आहे. याचा स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज़ आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो G37 प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU दिले आहे. लावाच्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळणार आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ड्युअल सिम स्लॉट दिला आहे. फोनध्ये ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. याशिवाय, डेप्थ आणि मायक्रो सेन्सर एलईडी फ्लॅश सोबत रियर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनच्या साइडवर फिंगरप्रिंट स्कॅनर मिळते.

वाचाः Airtel च्या ‘या’ स्वस्तात मस्त प्लान्समध्ये रोज १.५ GB Data सह ३ महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी आणि बरंच काही

वाचाः २३ सप्टेंबर पासून सेल, पोकोच्या या टॉप ५ बजेट स्मार्टफोनवर मिळणार बंपर डिस्काउंट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here