Maharashtra Board Exam 2022-23 Tentative Time Table Announced MSBSHSE HSC Exam Schedule Here

0
3


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra education board) वतीने घेण्यात येणाऱ्या  बारावीच्या परीक्षेचे  hsc exam) विषयनिहाय संभाव्य वेळापत्रक  आज जाहीर करण्यात आले आहे. 

बारावीची लेखी परीक्षा  21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

बारावी परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक जाहीर

 • 21 फेब्रुवारी  – इंग्रजी
 • 22 फेब्रुवारी  – हिंदी
 • 23 फेब्रुवारी – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
 • 24 फेब्रुवारी – संस्कृत
 • 27 फेब्रुवारी  – फिजिक्स
 • 1 मार्च – केमिस्ट्री
 • 3 मार्च – मॅथेमॅटिक्स अॅन्ड स्टॅटिस्टिक्स
 • 7 मार्च – बायोलॉजी
 • 9 मार्च – जियोलॉजी
 • 25 फेब्रुवारी-  ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेंट
 • 28 फेब्रुवारी – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
 • 1 मार्च – राज्यशास्त्र
 • 13मार्च – ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
 • 15 मार्च – ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
 • 9 मार्च – अर्थशास्त्र
 • 10 मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
 • 13 मार्च – बँकिंग पेपर – 1
 • 15 मार्च – बँकिंग पेपर – 2
 • 16 मार्च – भूगोल
 • 17 मार्च – इतिहास
 • 20 मार्च – समाजशास्त्र

शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.  

संबंधित बातम्या :

Maharashtra Board Exam Time Table : राज्य मंडळाच्या दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here