Maharashtra Corona Update On Monday 292 Patients Were Reported In The State And 390 Patients Were Corona Free

0
4


मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा (Corona Update) आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्क्यांवर आले आहे. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज 292 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 390 रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत. 

राज्यात  390 रुग्ण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Update) 

राज्यात सोमवारी 292 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 390 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 

राज्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,63,082 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.12 टक्के इतकं झालं आहे. 

राज्यात एकूण 4,440 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 

राज्यात एकूण 4,440 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 1009 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 683 सक्रिय रुग्ण आहेत.

देशात चार हजारहून अधिक नवे रुग्ण

देशात सोमवारी दिवसभरात 4 हजार 858 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी मंगळवारी 5 हजार 664 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या चार हजारांपर्यंत खाली घसरली आहे. देशातील कोरोनाचा आले दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत. मात्र देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे. देशात सध्या 48 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. आधीच्या दिवशी रविवारी ही संख्या 47 हजारांवर होती. तर त्याआधी शनिवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या 46 हजारांवर होती. सध्या देशात 48 हजार 27 सक्रिय रुग्ण आहेत. देशात एकूण 5 लाख 28 हजार 355 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 881 रुग्णांची नोंद तर 963 रुग्ण कोरोनामुक्त

Covid19 : चांगली बातमी! कोरोनाचा आलेख 4 हजारांवर घसरला, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 48 हजारांवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here