Maharashtra Corona Update On Tuesday 550 Patients Were Reported In The State And 772 Patients Were Corona Free Marathi News

0
4


Mumbai : राज्यात कोरोना रुग्णांचा (Corona Update) आकडा हळूहळू वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्र राज्यातील रूग्णांच्या संख्येत काहीशा फरकाने वाढ होतेय. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्क्यांवर आले आहे. मात्र, असे असले तरी राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज 550 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 772 रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत. 

राज्यात 772 रुग्ण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Update) 

राज्यात मंगळवारी 550 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 772 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 

राज्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,63,854 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.12 टक्के इतकं झालं आहे. 

राज्यात एकूण 4,440 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 

राज्यात एकूण 4,440 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 1009 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 683 सक्रिय रुग्ण आहेत.

देशात चार हजारहून अधिक नवे रुग्ण

देशात सोमवारी दिवसभरात 4 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज ही संख्या चार हजारांपर्यंत आली आहे. देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत. मात्र देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे. देशात सध्या 48 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. आधीच्या दिवशी रविवारी ही संख्या 47 हजारांवर होती. तर त्याआधी शनिवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या 46 हजारांवर होती. सध्या देशात 48 हजार 27 सक्रिय रुग्ण आहेत. देशात एकूण 5 लाख 28 हजार 355 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here