Nagpur Police Gave Complimentary Passes Of India Vs Australia Match To Orphans

0
7


IND vs AUS, Nagpur T20 : नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (Vidarbha Cricket Association Stadium) आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 2nd T20) यांच्यात दुसरा टी-ट्वेंटी सामना होत आहे. या स्टेडियमची आसनक्षमता 40 हजार इतकी आहे. पण नागपुरात बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना पार पडत असल्याने क्षमतेपेक्षा कितीतरीपटीने अधिक क्रिकेट रसिक सामना पाहण्यासाठी इच्छुक आहेत. अशामध्ये नागपूर पोलिसांना मिळालेले कॉम्प्लिमेंटरी पास त्यांनी स्वत: किंवा कुटुंबियासाठी न वापरता अनाथ मुलांना दान करत मनाचा मोठेपणा दाखवला आहे. सोबतच या अनाथ मुलांना हे पास देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International T20 Cricket Match) सामना पाहण्याची संधी या गरजूंना उपलब्ध करुन दिली आहे.

नागपूर पोलिसांमधील (Nagpur Police) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मिळणारे कॉम्प्लिमेंटरी पास आणि कॉर्पोरेट पास अनाथ मुलांना देत एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सायंकाळच्या सुमारास नागपुरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात काही अनाथ मुलांना बोलावून पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी आपापले कॉम्प्लिमेंटरी पास या मुलांना दिले. पोलिसांनी या सर्व अनाथ मुलांना नागपूर शहरातून स्टेडियम पर्यंत नेण्याची आणि सुरक्षित परत त्यांच्या होस्टेलमध्ये सोडण्याची ही व्यवस्था केली आहे.

सामन्यात पावसाचा व्यत्यय 

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (Vidarbha Cricket Association Stadium) पार पडणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट निर्माण झालं असल्याच्या बातम्या कालपासून समोर येत होत्या. कारण हवामान विभागाने 22 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना सायंकाळी होणार असून याच दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याच काळानंतर नागपूरात आंतरराष्ट्रीय सामना होत असल्याने त्यावर पावसाचं सावट आल्यानं प्रेक्षकांची धाकधूक वाढली होती. त्यानुसार सामन्यात पावसाने व्यत्यय निर्माणही केला आहे. 7 वाजता सामना सुरु असून बराच काळानंतही नाणेफेकही झालेली नसल्याचं दिसून आलं.

  

महत्वाच्या बातम्या : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here