Offensive Video, धक्कादायक! पाचवीतील विद्यार्थिनींना शिक्षक वर्गात दाखवायचा अश्लील व्हिडिओ, विद्यार्थिनींनी हिंमत करून पालकांना सगळे सांगितले – the teacher used to show offensive videos to the class 5 girl students in kullu of himachal pradesh

0
4


कुल्लू : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात एका शिक्षकाचे घृणास्पद कृत्य उघड झाली आहे. सरकारी प्राथमिक शाळेतील या शिक्षकाच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आरोपी शिक्षक शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ दाखवत असे. इतकेच नाही, तर हा शिक्षक या निष्पाप विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळेही करत असे. शिक्षकाच्या या कृत्याबद्दल मुलींनी पालकांना सांगितले तेव्हा त्यांच्या या कृत्याचा पर्दाफाश झाला. याबाबत पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर शिक्षक गायब झाला आहे. पोलिसांनी या फरार आरोपी शिक्षकाला अजूनही पकडू शकलेले नाहीत. (the teacher used to show offensive videos to the class 5 girl students)

शाळेत अश्‍लील कृत्य केल्यानंतर या बाबत कोणालाही न सांगण्याची धमकीही या शिक्षकाने विद्यार्थिनींना दिली होती. कोणाला सांगितल्यास काठीने मारेन अशीही धमकी हा शिक्षक द्यायचा. मात्र मुलींनी धाडस दाखवत सर्व काही पालकांना सांगितले. यांपैकी एका पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा शिक्षक आपल्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवतो, असे फिर्यादीत स्पष्टपणे नमूद केले आहे.

२०-२० रुपयांत ट्विटरवर विकले जाते चाइल्ड पॉर्न; पकडले गेल्यास किती होईल शिक्षा, पाहा!
शिक्षकाचा शोध सुरू

आपली तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची कुणकुण लागताच आरोपी शिक्षक रजेवर गेला. मात्र, बुधवारी या शिक्षकाच्या शोधासाठी पोलिस ठाण्यातून एक पथक रवाना करण्यात आले आहे. मात्र त्याचा कोणताही मागमूस सापडलेला नाही. मात्र, आज शिक्षकाला अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मोहाली MMS प्रकरण: होय, तिने व्हिडिओ बनवले; आरोपी तरुणीच्या वकिलाचा मोठा खुलासा
आज डीएसपी स्वत: करणार तपास

आपण स्वतः शाळेत जाऊन या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) आनी रवींद्र नेगी यांनी म्हटले आहे. यामध्ये सत्यता आढळून आल्यास शिक्षकावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. यापूर्वीही या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मंगळवारी पुन्हा पालकांनी तक्रार केली असल्याचे पोलीस उपधीक्षकांनी सांगितले.

छप्पर फाड़ के! रिक्षा चालकाने ३ लाखांच्या कर्जासाठी अर्ज केला, दुसऱ्या दिवशी लागली २५ कोटींची लॉटरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here