palak tiwari new photoshoot with netted clothes from top to bottom shweta tiwari daughter

0
5


मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (shweta tiwari) हीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खुपच चर्चेत असते. पलक (Palak Tiwari) तिच्या नवनवीन फोटोशुटमुळे नेहमीच चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा ती अशाच फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. नेमकं या फोटोशुटमध्ये तिने असं काय ज्यामुळे तीची चर्चा होतेय ते जाणून घेऊयात. 

21 वर्षीय पलक तिवारी (Palak Tiwari) तिच्या फोटोशुटमुळे इंटरनेटवर नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने फोटोशुट केलं आहे. या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

फोटोत काय?
पलक तिवारीने (Palak Tiwari) तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती वरपासून खालपर्यंत पांढऱ्या जाळीदार ड्रेसमध्ये दिसत आहे.तिचा टॉप आणि पँट खूपच खुलून दिसते. विशेष म्हणजे या जाळीदार कपड्यात ती आपलं सौंदर्य खुलवताना दिसत आहे.  

पलकने (Palak Tiwari) तिचा लुक पुर्ण करण्यासाठी पांढऱ्या रंगाची हाय हिल्स परिधान केली आहे. तसेच तिने केस मोकळे सोडले आहेत. यामुळे ती फोटोत आणखीणच सुंदर दिसत आहे. पलक या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

पलक तिवारीचे (Palak Tiwari) हे फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. तिच्या या फोटोवर चाहते तुफान लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. पलकच्या या फोटोंवर कमेंट करत अनेक यूजर्सने तिला हॉट, बोल्ड, ब्युटीफुल बाम म्हटले आहे.

‘या’ सिनेमात झळकणार

पलक तिवारीच्या (Palak Tiwari) वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) किसी का भाई किसी की जान या चित्रपटात ती दिसणार आहे. या संदर्भात तिने अधिकृतपणे जाहीर केले होते. या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here