plans under 100, २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणाऱ्या या Jio Plans बद्दल माहितेय ? सुरुवातीची किंमत ९१ रुपये – these budget jio plans offers 28 days validity and data to its users

0
7


नवी दिल्ली:Jio Plans Under 200:Jio, युजर्सना बजेट किमतीपासून ते अगदी १-२ हजार रुपयांपर्यंतचे प्लान्स ऑफर करते. या प्लान्समध्ये मिळणारे बेनेफिट्स किंमत आणि युजर्सच्या गरजेनुसार असतात. तुम्हीही जर जिओ युजर असाल आणि स्वस्तात मस्त प्लान्सच्या शोधात असाल तर, कंपनीचे हे ३ प्लान्स तुम्हाला नक्कीच आवडतील. विशेष म्हणजे हे प्लान्स स्वस्त असले तरी त्यांची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे आणि त्यांची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे Jio प्लान्स फक्त JioPhone युजर्ससाठी आहेत. याचा अर्थ जर तुम्ही Jio फोन वापरत असाल तर तुम्ही या प्लान्सचा लाभ घेऊ शकता. जाणून घेऊया जिओच्या या भन्नाट प्लान्सबद्दल सविस्तर.

वाचा: तालिबानने PUBG सह ‘या’ लोकप्रिय App वर घातली बंदी, कारण वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Jio चा ९१ रुपयांचा प्लान:

यात कंपनी दररोज १०० MB डेटा देत आहे. यासह तुम्हाला २०० MB डेटा मिळेल. २८ दिवसांच्या वैधतेसह या सर्वात स्वस्त प्लानमध्ये कंपनी एकूण ३ जीबी डेटा देते. यासोबतच तुम्हाला ५० एसएमएस देखील दिले जातील. स्वस्त असूनही, या प्लॅनमध्ये इतर फायदे दिले जातात. यात तुम्हाला Jio Cloud, Jio TV, Jio Security आणि Jio Cinema सारख्या अॅप्समध्ये मोफत प्रवेश मिळेल.

वाचा: Latest Smartphones: मागील आठवड्यात ‘या’ दमदार स्मार्टफोन्सने केली मार्केटमध्ये एन्ट्री, पाहा तुमच्यासाठी कोणता बेस्ट

Jio चा १५२ रुपयांचा प्लान:

Jio प्रीपेड प्लानसह, अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ०.५ GB म्हणजेच ५०० MB डेटा दिला जाईल आणि फक्त ३०० SMS दिले जातात. २८ दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये एकूण १४ GB डेटा उपलब्ध असेल. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, Jio Cinema, Jio TV, Jio Security आणि Jio Cloud सारख्या अॅप्सचा अॅक्सेस दिला जाईल.

Jio चा १८६ रुपयांचा प्लान:

या Jio प्लानसह, कंपनी युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १ GB डेटासह कोणत्याही नेटवर्कवर दररोज १०० SMS ऑफर करत आहे. हा प्लान २८ दिवसांची वैधता देतो. त्यामुळे यामध्ये तुम्हाला एकूण २८ GB डेटा मिळेल. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio सिक्युरिटी यांसारख्या अॅप्सवर मोफत प्रवेश देखील मिळेल.

वाचा: अधिक कॉल्स करणाऱ्यांसाठी Airtel चा बेस्ट प्लान, वर्षभर अनलिमिटेड कॉल्ससह मिळणार २४ GB डेटा, पाहा किंमत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here