Rajasthan Cm Ashok Gehlot Will Join Bharat Jodo Yatra Today In Kochi Marathi News

0
5


Congress : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot)यांनी बुधवारी सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान केवळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंधित विषयांवरच चर्चा झाल्याचे मानले जात आहे. राहुल गांधींनी नकार दिल्यानंतर सीएम गेहलोत यांनीही उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

सोनिया गांधी यांची भेट, गेहलोत अध्यक्षपदासाठी तयार?

बुधवारी अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान केवळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंधित विषयांवरच चर्चा झाल्याचे मानले जात आहे.  त्यानंतर गेहलोत यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले. गेहलोत काल संध्याकाळी दिल्लीहून मुंबईत पोहोचले. 

आज भारत जोडो यात्रेत होणार सामील
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएम गेहलोत दिल्लीतील पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल यांच्यासोबत कोचीला जाणार आहेत. जिथे राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सामील होतील. सीएम गेहलोत यांनी मंगळवारी काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सांगितले की, या भेटीदरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत शेवटचा प्रयत्न करतील की राहुल गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी सहमती द्यावी.

 

सीएम गेहलोत यांच्या प्रश्नावर सचिन पायलट म्हणाले होते की, दोन-तीन दिवस वाट पाहावी. नावनोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, निवडणुका पूर्ण पारदर्शकतेने होतील. राजस्थानमध्ये निवडणूक जिंकणे हे आमचे ध्येय आहे. सचिन पायलट भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी कोचीला गेले आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष बनण्याच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत दिल्लीला गेले आहेत. सीएम गेहलोत यांनी सोनिया गांधींसह वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. कोचीमध्ये मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर सचिन पायलट म्हणाले की, आम्ही पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचे पालन करू. जी भूमिका पक्ष ठरवेल. ते मी स्वीकारेल.

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here