raju srivastav, उद्धव ठाकरेंची डरकाळी, शहांवर निशाणा ते लालबागचा राजा मंडळाला दंड; वाचा, मटा ऑनलाइच्या टॉप १० न्यूज – uddhav thackeray amit shah raju srivastav maharashtra times online todays top ten news headlines 21 september 2022

0
0


मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१. जमीन दाखवा म्हणणाऱ्या अमित शहांना अस्मान दाखवा; उद्धव ठाकरेंची डरकाळी

सध्या मुंबईत दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन आठवड्यांवर दसरा येऊन ठेपलाय त्यापूर्वी आज गोरेगाव येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली.

२. देवेंद्र फडणवीसांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक; ठाकरेंचा थेट नाव घेऊन निशाणा

देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक, होय, तुमच्या आयुष्यातील ही शेवटचीच निवडणूक आहे. मग तुम्ही विचाराल आपलं काय, तर मी म्हणेन, की आपल्या आयुष्यातील ही पहिलीची निवडणूक आहे असं समजून लढा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

३. शिंदे सरकारचं पोलिसांना गिफ्ट, रजांमध्ये मोठी वाढ, ७२३१ पदांची पोलीस भरती होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील पोलिसांना दिलासा देत शिंदे सरकारनं नैमित्तिक रजा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

४. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी झुंज अपयशी; ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ख्यातनाम स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या ४० दिवसांपासून ते इस्पितळात दाखल होते. जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

५. रेल्वेची भिंत बांधण्याचं काम सुरु होतं, भिंतीचा काही भाग कोसळला, २ जणांचा जागीच मृत्यू

डोंबिवलीतील रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु असताना भिंत कोसळून पाच मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी दोन मजूरांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी तातडीने अग्नीशमन पथक दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

६. मुख्यमंत्र्यांची तीन तास वाट पाहिल्यानंतर रागात निघाल्याच्या चर्चा, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबईतील फिफा लोगो अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळेत न आल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार निघून गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकारांसोबत बोलताना सविस्तर माहिती दिली.

७. दसरा मेळाव्याला पालिकेने परवानगी न दिल्याने शिवसेना हायकोर्टात, उद्या तातडीची सुनावणी

दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली.

८. ‘लालबागचा राजा’ मंडळाला पालिकेने ठोठावला ३ लाखांचा दंड; ‘हे’ आहे कारण

यंदाच्या गणेशोत्सवात लालबागचा राजा मंडळाने दर्शनाच्या रांगांसाठी बॅरिकेड्स उभारताना रस्त्यावर खड्डे पाडल्यामुळे पालिकेच्या भायखळा ‘ई’ विभागाने मंडळाला ३ लाख ६६ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे.

९. भारताच्या पराभवावर सुनील गावसकर भडकले; रोहित आणि द्रविडवर साधला निशाणा

दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकार यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाच्या पाहिल्याच पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची डेथ ओव्हर्समधील खराब कामगिरी ही भारतासाठी ‘खरी चिंतेची बाब’ असल्याचे गावसकर यांचे मत आहे.

१०. सर्वांना हसवणाऱ्याने अखेर रडवले, बॉलिवूडमध्ये कसा टिकला ‘गजोधर भैय्या’; इथे मिळेल उत्तर

स्टँडअप कॉमेडीच्या स्टेजवरून पोट धरून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं नाव विनोदवीर म्हणून लोकप्रिय झालं. पण कॉमेडियन म्हणून यशस्वी होण्याबरोबरच राजू श्रीवास्तव यांनी बॉलिवूडमध्ये ११७ सिनेमांमधून अभिनयाचीही झलक दाखवली आहे.

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here