shivsena dasara melava controversy, बाळासाहेबांनी कारच्या बोनटवर उभं राहून केलं होतं भाषण; उद्धव ठाकरे इतिहासाची पुनरावृत्ती करणार? – shivaji park dussehra rally will uddhav thackeray repeat history of balasaheb thackeray

0
3


मुंबईः दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असतानाच अद्यापही शिवाजी पार्क मैदानासाठी मुंबई महापालिकेची परवानगी मिळालेली नाही. शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाने पालिकेकडे परवानगी मागितली आहे. त्यावरुनच राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. शिवाजी पार्कमध्ये कोणाची सभा होणार याकडे लक्ष लागून राहिलं असतानाच आता शिवसेनेनंही चाचपणी सुरू केली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा निर्धार शिवसेनेनं केला असून उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची आयडिया वापरणार का?, अशी चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. (shivsena dasara melava controversy)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेची ही ५६ वर्षांची परंपरा आहे. यापूर्वी चार दिवसांत परवानगी दिली जात होती. यंदा पत्र देऊन एक महिना उलटल्यानंतरही पालिकेने परवानगी दिलेली नाही. त्यामुळं शिवसैनिक नाराज झाल्याची चर्चा आहे. जर परवानगी नाही मिळातील तर ६०च्या दशकात ज्या प्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी फियाट गाडीवर उभं राहून भाषण केलं होतं त्याप्रमाणेच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेही शिवाजी पार्क मैदानात गाडीवर उभं राहून सभा घेतील, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शिवाजी पार्क मैदान व दसरा मेळावा हा विषय आता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा बनला आहे, असं राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. उद्धव ठाकरे दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यास यशस्वी ठरल्यास बाळासाहेबांचे वारसदार व खरी शिवसेना ही त्यांचीच असल्याचं ते सिद्ध करु शकतात. याचा फायदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो, असं जाणकारांचे मत आहे. त्यामुळं या मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ सुरू आहे.

वाचाः Dasra Melava: दसरा मेळाव्याचा फैसला उद्या होणार, हायकोर्टाकडून शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी

ठाकरे परिवार आणि शिवाजी पार्क यांचे नाते खूप वर्षांपासूनचे आहे. गेल्या ५६ वर्षांपासून या मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर गेल्या ९ वर्षांपासून उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात भाषण करतात. मात्र, यावर्षी सरकारच्या दबावामुळं मुंबई महानगरपालिका परवानगी देण्यात येत नाहीये, असं शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांनी म्हटलं आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळावा करते. या दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येतात. मेळाव्यात पक्षाचा प्रवास व रुपरेखा सांगण्यात येते. यंदाही शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा होणार. तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात. मग सरकार किंवा बीएमसीमे परवानगी नाकारली तरीही आम्ही मेळावा घेणारच, असा निर्धान शिवसेना संघटक विनय शुक्ला यांनी म्हटलं आहे.

वाचाः Dasra Melava: दसरा मेळाव्याला तेजस ठाकरेंचं राजकीय लाँचिंग? बॅनर्स लागल्याने जोरदार चर्चा

शिवसेना कोर्टात

मुंबई महापालिका, मुंबई महापालिका आयुक्त आणि जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्याविरोधात शिवसेनेची रिट याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने उद्याच या याचिकेवर तातडीची सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही, याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता आहे.

वाचाः दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी टोलवाटोलवी; शिवसेनेनं केला गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here