shivsena sada sarvankar, धारावीत सदा सरवणकरांच्या बैठकीनंतर राडा; ठाकरे समर्थक ३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल – clashes between shinde group and thackeray supporters after rebel shiv sena mla sada saravankars meeting in dharavi

0
5


मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधींसह संघटनेतील पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्यासह बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे स्थानिक पातळीवरही शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील धारावीतही असाच प्रकार घडला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्या धारावीतील बैठकीनंतर शिंदे गट आणि शिवसेनेचे पदाधिकारी आमने-सामने आले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर धारावी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र सुर्यवंशी, मुथू पठाण आणि चेतन सुर्यवंशी अशी गुन्हा नोंद झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

Abdul Sattar: मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा, पण भाजपची परवानगी गरजेची: अब्दुल सत्तार

दरम्यान, आमच्याविरोधात खोटे आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये याआधीही संघर्ष झाला होता.गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तुलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here