single mom story, बाळाला खांद्यावर घेऊन हाकतेय संसाराचा गाडा, या सिंगल मॉमने दाखवून दिलं – आई काहीही करु शकते – noida news in marathi single mom chanchal sharma drives e-rickshaw with baby strapped to her for living know her inspiring story

0
3


नोएडा: नोएडातील एका सिंगल मॉमची गोष्ट तुम्हाला बॉलिवूड चित्रपटातील वाटेल. पण, ही कहाणी कुठल्याची चित्रपटाची नाही तर खरी आहे. चंचल शर्मा असं या आईचं नाव आहे. या त्यांच्या बाळाला खांद्यावर लटकवून आयुष्य जगण्याचा संघर्ष करत आहेत. त्यांच्या ई-रिक्षाची चाके जशी पुढे जातात, त्याचप्रमाणे त्याच्या आयुष्याची चाकंही यशाच्या दिशेने फिरत आहेत. नोएडातील या सिंगल मॉमने तिच्या मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी आपले आयुष्य समर्पित केलं आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या ई-रिक्षा चालकांमध्ये त्या आपला ठसा उमटवत असल्याचे दिसत आहे.

खांद्यावर बांधलेलं बाळ आणि आयुष्याचं स्टेअरिंग हातात

रस्त्यात जर तुम्हाला चंचल शर्मा दिसल्या तर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करु शकणार नाही. खांद्यावर बांधलेलं बाळ आणि स्टेअरिंग हातात घेऊन त्या आयुष्यातील संघर्षावर मात करत आहेत. चंचलला दिवस सुरु होतो तो संघर्षाने. त्या सकाळी साडे सहावाजता रस्त्यावर रिक्षा आणि आपल्या बाळासह निघतात. त्यानंतर दुपारी बाळाला आंघोळ घालायला घरी येतात. मग दुपारच्या जेवणानंतर पुन्हा त्या रिक्षा घेऊन निघतात. जर मुलाला रस्त्यात भूक लागली तर त्यासाठी दुधाची बाटली त्यांच्यासोबत असते. सेक्टर ६२ मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल आणि सेक्टर ५९ मधील लेबर चौक दरम्यान चंचल त्यांची ई-रिक्षा चालवतात. त्याची ई-रिक्षा सुमारे ६.५ किमी दरम्यान धावते.

हेही वाचा-समुद्राच्या पोटात सापडला १३०० वर्ष जुना खजिना, सोनं-चांदी, हिरे, मोती नव्हे; २०० माठांतून निघाल्या वेगळ्याच वस्तू

मुलाला असं आयुष्य द्यायचं आहे जे मला मिळालं नाही – चंचल

नोएडा येथील २७ वर्षीय चंचल शर्माची वेदना ही देशातील लाखो नोकरदार मातांच्या वेदनांसारखीच आहे. जर एखाद्या महिलेला आपल्या मुलाला क्रेच किंवा डेकेअरमध्ये ठेवणे परवडत नसेल तर तिला काम करताना खूप त्रास सहन करावा लागतो. गेल्या वर्षी मुलगा अंकुशच्या जन्मानंतर दीड महिन्यानंतर चंचलने नोकरी शोधायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनाही याच समस्येचा सामना करावा लागला. नंतर त्यांनी ई-रिक्षा घेतली. रिक्षा चालवताना त्या त्यांच्या मुलाला घेऊन जाऊ शकत होत्या. चंचल म्हणतात, माझ्या मुलाला मला असं आयुष्य द्यायचं आहे जे मला मिळालं नाही.

चंचलच्या या प्रयत्नाचे सर्वांकडून कौतुक

चंचलने मुख्यतः पुरुषांचे वर्चस्व असलेला व्यवसाय निवडला आहे. असे असूनही त्या आपल्या कामासाठी समर्पित आहेत. त्या ज्या मार्गावर ई-रिक्षा चालवत आहे, त्या मार्गावर फक्त त्या एकमेव महिला चालक आहेत. लहान मुलाला खांद्यावर बांधून ई-रिक्षा चालवणारी चंचल सर्वांचे लक्ष वेधून घेते. माझ्या वाहनात बसलेल्या प्रवाशांनी कौतुक केले असल्याचं त्या म्हणतात. महिला प्रवाशांनाही माझी ई-रिक्षा आवडते, असंही त्या सांगतात.

हेही वाचा-माणसं वारंवार पडताहेत आजारी, कनेक्शन थेट बेडकांशी; अहवालातून चिंताजनक माहिती समोर

चंचल पतीपासून विभक्त

चंचल या पतीपासून विभक्त झाल्या आहे. त्या त्यांच्या आईसोबत एका खोलीत राहतात. चंचल म्हणतात की मी मुलगा अंकुशला घरी सोडू शकत नाही. माझी आई हातगाडीवर कांदा विकते. माझा भाऊ क्वचितच घरी असतो. त्यामुळे गाडी चालवताना मला माझ्या मुलाला सोबत घेऊन जावे लागते. चंचलला तीन बहिणी आहेत, त्या विवाहित आहेत आणि त्यांच्या कुटुंबासह दूर राहतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधून १० वीपर्यंत शिकलेल्या चंचल सांगतात की, त्या दिवसाला ६००-७०० रुपये कमवतात. यातील ३०० रुपये खाजगी एजन्सीकडे जातात ज्याने त्यांना बॅटरीवर चालणाऱ्या वाहनासाठी कर्ज दिले आहे.

हेही वाचा-मध्यरात्री रेल्वे स्थानकावर घेऊन फिरला, मग मैदानात नेऊन महिलेला संपवलं, परभणीत थरार

चंचल म्हणतात की, जेव्हा शक्य असेल तेव्हा मी अंकुशला माझ्या बहिणी किंवा माझ्या आईसोबत सोडते, पण हे फार कमी होते. हे महिन्यातून फक्त २-३ दिवस घडते. तेही आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत. त्या म्हणतेात की यंदाचा उन्हाळ्या त्यांच्यासाठी आणि अंकुशसाठी अत्यंत कठीण होता. गर्मीमुळे मी गाडी चालवताना तो खूप रडायचा. चंचल पूर्ण आत्मविश्वासाने सांगते की, माझ्या मुलाला उत्तम आयुष्य देण्यासाठी मी सतत काम करत आहे, जे मला मिळाले नाही. मात्र, निश्चित उत्पन्न न मिळाल्याने त्या चिंतेत आहेत. भविष्यातील खर्चाची चिंता त्यांना असल्याचंही त्या म्हणाल्या.

चंद्रा’ फेम जयेश खरेची हृदयस्पर्शी कहाणी; वडील ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात,पण मुलाला गायक बनवण्यासाठी धडपड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here