sugar Cane Crushing season starting 15 october 2022 decision cm eknath shinde ssa 97

0
5मुंबई : राज्यातील ऊसाचे वाढते पीक लक्षात घेता, यंदा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु करण्याची तयारी सहकार विभागाने केली होती. मात्र, आता १५ ऑक्टोबरपासून २०२२-२३ सालचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत ऊसाच्या लागवडीमध्ये दोन लाख हेक्टरने वाढ नोंदवली आहे. यंदा १४.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे पीक आले आहे. तसेच, यंदाच्या हंगामात १३८ लाख मेट्रिक टन ऊसाच्या गाळपाची अपेक्षा आहे. ऊसाचे गाळप वेळेवरती होण्यासाठी यंदाचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु होण्याची शक्यता होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आज ( १९ सप्टेंबर ) सहकार विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

८१ कारखान्यांनी थकवली एफआरपी

दरम्यान, गेल्या हंगामात शेतकऱ्यांना एकूण ४३ हजार ३१० कोटी रुपयांची एफआरपी मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी ४२ हजार ६७१ कोटी रुपयांची एफआरपी आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली आहे. मात्र अजूनही ८१ कारखान्यांनी ६३९ कोटी रुपये थकविले आहेत, तर ११९ कारखान्यांनी शेतकऱ्यांची देय ‘एफआरपी’ संपूर्णपणे दिली आहे.

कारवाई काय?

ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही त्यांच्यावर जमीन महसुलाची थकबाकी समजून कारवाई सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार सात कारखान्यांविरोधात ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here