sunil gavaskar raised questions on bhuvneshwar kumar 19th over india vs australia

0
6


Sunil Gavaskar : भारतीय संघाला (Team India) मागील काही सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागत आहे. त्याला कारण ठरतंय भारतीय संघाची गोलंदाजी. प्रथम पाकिस्तान, नंतर श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) भारताची गोलंदाजी पराभवाचं कारण ठरली. या तीनही सामन्यात 19 वी ओव्हर सर्वात मारक ठरली. त्यावरून आता भारतीय संघाचे माजी स्टार खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहितसेनेला खडे बोल सुनावले आहेत. (sunil gavaskar raised questions on bhuvneshwar kumar 19th over india vs australia)

काय म्हणाले Sunil Gavaskar ?

भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) मागील 3 सामन्यात 19 वी ओव्हर टाकली होती. त्यात भुवनेश्वरने खुप धावा दिल्या. त्यावर बोलताना आगामी T20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी ही धोक्याची घंटा असल्याचं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतीय संघाला काही सुचना देखील दिल्या आहेत.

मला वाटत नाही की, मैदानावर खुप दव होते. गोलंदाज चांगली बॉलिंग टाकू शकत होता. मात्र, हे पहायला मिळालं नाही. आपण चांगली गोलंदाजी केली नसल्याने त्याचा फटका बसलाय. 19 वी ओव्हर ही खरोखरच चिंतेची बाब असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. भुवनेश्वर सारखा अनुभवी गोलंदाज रन देत असेल तर संघ कसा जिंकणार?, मागील तीन सामन्यात भुवीने 19 वी ओव्हर टाकताना 3 षटकात 49 धावा दिल्या आहे. हे खरोखच भयानक असल्याचं गावस्कर यांनी म्हटलंय.

जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) संघात पुनरागमन झाल्याने आता भारतीय गोलंदाजी आणखी मजबूत होईल, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. बुमराह जेव्हा टॉप ऑर्डर विकेट घेतो तेव्हा कदाचित ही पूर्णपणे वेगळी परिस्थिती असेल, असंही गावस्कर यावेळी म्हणाले आहेत. पहिला सामना गमावलात, पण हे कधीही विसरू नका की ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन आहे, असं म्हणत गावस्कर यांनी रोहितसेनेला खडे बोल सुनावले आहेत.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here