suryakumar yadav, भारतीय संघाला धक्का बसल्यावरही सूर्यकुमार यादवसाठी आली गूड न्यूज, पाहा नेमकं घडलं काय… – good news came for suryakumar yadav even after indian team was shocked in 1st t20 against australia

0
1


मोहाली : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. पण दुसरीकडे मात्र या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक यावेळी थोडक्यात हुकले. पण यावेळी सूर्यकुमारने जी गोष्ट केली आहे ती विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही करता आलेली नाही.

मंगळवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने २०८ धावा केल्या, त्यामध्ये सूर्यकुमारचे ४६ धावांचे योगदान होते. सूर्यकुमारने यावेळी या ४६ धावा फक्त २५ चेंडूंत केल्या होत्या. पण चार धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. पण तरीही सूर्यकुमारसाठी आता एक गूड न्यूज आली आहे आणि याचा फायदा त्याला दुसऱ्या सामन्यात होऊ शकतो.

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताच्या सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकले आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत त्याने तिसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमारने ४६ धावांची खेळी साकारली. या खेळीमुळे त्याने फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानमधील अंतरही कमी केले. सूर्यकुमार आता रिझवानपेक्षा फक्त ४५ रेटिंग गुणांनी मागे आहे. रिझवानने मंगळवारी कराचीमध्ये पाकिस्तानच्या इंग्लंडविरुद्धच्या पराभवादरम्यान अर्धशतक झळकावले आणि कारकिर्दीतील सर्वोत्तम ८२५ गुणांसह फलंदाजी यादीत आपली आघाडी कायम ठेवली.

या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम दुसऱ्या (७९२ गुण) आणि सूर्यकुमार (७८० गुण) तिसऱ्या स्थानावर आहे. आशिया चषकात अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्याने आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात केवळ ३१ धावा केल्याने बाबर चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान (७२५ गुण) पाचव्या तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (७१५ गुण) सहाव्या स्थानावर आहे. सूर्यकुमार व्यतिरिक्त स्टार भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने २२ स्थानांनी झेप घेतली असून तो ६५व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये त्याने नाबाद ७१ धावांची खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल मंगळवारी तीन बळी घेतले आणि ट्वेन्टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत २४ स्थानांनी झेप घेत ३३व्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी दुसऱ्या स्थानावर आहे तर पाकिस्तानविरुद्ध दोन बळी घेणारा लेगस्पिनर आदिल रशीद तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या यादीत चार स्थानांची प्रगती केली असून तो २१व्या स्थानावर आहे. त्याचा सहकारी मोहम्मद नवाजही तीन स्थानांनी प्रगती करत ३१व्या स्थानावर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here