tu tevha tashi, स्वप्निल जोशीनं दाखवलं त्याचं सर्वात आनंदाचं ठिकाण, चाहते म्हणतायत आम्हालाही इथे यायचंय! – marathi actor swapnil joshi shares his happy place on social media goes viral

0
4


मुंबई : अभिनेता स्वप्निल जोशीचं मालिकेचं शूटिंग सुरू आहे. तू तेव्हा तशी मालिकेत आता अनपेक्षित वळण आलं आहे. अचानक अनामिकाचा नवरा उपस्थित होतो आणि तो कंपनीचा मालकही आहे. त्याच्या हाताखाली सौरभ आणि अनामिकाला काम करावं लागतंय. मालिकेत जितका तणाव दाखवला जातो, तितकाच आनंद शूटिंगच्या ठिकाणी असतो.

स्वप्निलनं सोशल मीडियावर शूटिंगच्या ठिकाणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर त्यानं लिहिलं आहे, शूट लाइफ, माझं आनंदाचं ठिकाण. कलाकार दिवस-रात्र शूटिंग करत असतात. वेगवेगळे प्रसंग उभे करत असतात. पण त्यात त्यांना कामाचं समाधान मिळत राहतं. त्यामुळे तिथे ते आनंदात, उत्साहात असतात. स्वप्निलला हेच सांगायचंय.

Video : कांचननं काळजीनं अरुंधतीला केला फोन, पण एक गोष्ट कळल्यावर झाली नारा

यावर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्यात. काहींनी तर आम्हालाही असं आयुष्य आवडेल असं म्हटलं आहे. चाहते नेहमीच कलाकारांच्या आयुष्यात काय चाललंय, याबद्दल उत्सुक असतात.

शिवाय अनेक तास सगळे जण एकत्र असल्यामुळे कलाकारांमध्ये बाँडिंग तयार होत असतं. तो वेळ ते एंजाॅय करतात. स्वप्निलनं अनेकदा सेटवरचे व्हिडिओ शेअर केले आहेत. मध्यंतरी त्यानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यानं एक व्हिडिओ शेअर केला होता. अंधारात सगळे कलाकार बसले आहेत. स्वप्निलनं काय नक्की झालं, ते लिहिलंय. तो म्हणतोय, ‘काल सेट वर शूट करताना लाइट्स गेले ! काही काळ पूर्ण अंधार होता. लाइटमन आपलं काम करत होते, कनेक्शन चेक करत होते आणि आम्ही सगळे टीम म्हणून ती शांतता एंजाॅय करत होतो ! शब्दात सांगू शकत नाही, पण ती शांतता आम्हाला एक टीम म्हणून आपलंसं करून गेली !’

गौरी खानला सोसावा लागतोय शाहरुखची पत्नी असल्याचा फटका

मराठी मालिकांमध्ये सध्या नवे ट्रेंड येताहेत. यामध्ये वयाच्या चाळीशीनंतर आयुष्यात येणारं प्रेम, त्यामध्ये येणारे अडथळे, त्यातून फुलणारं नातं हा फ्लेवर प्रेक्षकांनाही आवडतोय. एकीकडे सेकंड इनिंग दाखवत असताना मालिकेच्या तरुण प्रेक्षकांनाही खिळवून ठेवण्याचा फंडा वापरला जातोय. तू तेव्हा तशी या मालिकेला पसंती मिळतेय ती याच कारणामुळे.

‘रंगीला गर्ल’चा मराठी सिनेसृष्टीत कमबॅक, लवकरच झळकणार मराठी चित्रपटात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here