vaijapur mla ramesh bornare, अंबादास दानवेंचं ‘मिशन ५०’ पूर्ण, बोरनारेंना हादरा, काँग्रेस-राष्ट्रवादीचाही करेक्ट कार्यक्रम – maharashtra political news shivsena aurangabad ambadas danve mission 50 jolt to shinde camp mla ramesh bornare ncp congress

0
1


औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले औरंगाबादमधील वैजापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार झटका दिला. वैजापूर तालुक्यातील पन्नास गावातील ग्रामपंचायत सदस्य गळाला लावत शिवसेनेत आणले आहेत.

यापूर्वी सचिन तायडेच्या रूपात काँग्रेस पदाधिकाऱ्याचा शिवसेना प्रवेश झाला होता. तर आज औरंगाबाद राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष विजयराव साळवे यांनी देखील त्यांच्या समर्थकांसह सेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन त्यांना बांधण्यात आले. मात्र अंबादास दानवे हे मित्रपक्षातीलच पदाधिकाऱ्यांना गळाला लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

शिंदे गटातील आमदार रमेश बोरनारे यांच्या वैजापूर मतदारसंघातील जितेंद्र पाटील जगदाळे, सरपंच जानेफळ, विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष
कैलास सुरेश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वालफ कुहिले, जानेफळ गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष जगन पाटील जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य करजगाव तान्हाजी पाटील उगले, सरपंच पेडेफळ सोपान पाटील आहेर, सुनील पाटील मतसगर जानेफळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा : शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या वादात फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, एकदाच दोन मतदारसंघात शिवसेनेचा कार्यक्रम

वैजापूरच्या ५० गावातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच हे येत्या काही दिवसांत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी माजी जिल्हाअध्यक्ष विजयराव साळवे, संघर्ष सोनवणे, विक्की चावरीया व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार उदयसिंह राजपूत, उपजिल्हाप्रमुख जिल्हा परिषद सभापती अविनाश पाटील गलांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आज शिवसेनेत पक्षप्रवेश घेतलेल्या संभाजीनगर पश्चिम व वैजापूर मधील सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. निवडणुका केव्हाही जाहीर होतील. पुढच्या निवडणुकीत शिवरायांचा भगवा फडकावयाचा आहे, त्यामुळे शिवसेना बळकटीकरणासाठी कामाला लागा असे मार्गदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन कार्यकर्त्यांना केले असून येत्या काळात मोठा प्रवेश सोहळा होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

हेही वाचा : ठाकरे उभे राहतील तिथे दसरा मेळावा, शिवसेनेची तोफ धडाडली, शिंदेंना गुवाहाटीत मेळावा घेण्याचा सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here