vivo t1 5g offers, एक-दोन नाही तर Vivo च्या ४ स्मार्टफोन्सवर मिळताहेत भन्नाट डील्स, असा मिळवा फायदा, पाहा डिटेल्स – massive discounts on vivo smartphones with exchange offers check list

0
4


नवी दिल्ली: Vivo Smartphones: चिनी टेक कंपनी Vivo आपल्या T-Series स्मार्टफोन्सवर विशेष सूट देणार आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल या आठवड्यात सुरू होणार असून २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान फ्लिपकार्टवर होणाऱ्या बिग बिलियन डेज सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर्सचा लाभ मिळणार आहे. Vivo ने अलीकडेच Vivo T1 5G स्पेशल फेस्टिव्ह एडिशन नवीन सिल्की व्हाईट कलरमध्ये लाँच केले आहे. फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, काही कॅशबॅक डील देखील या डिव्हाइसवर आणि इतर टी-सीरीज डिव्हाइसवर ऑफर करण्यात येत आहे.

वाचा: २०० MP कॅमेरासह येणाऱ्या Motorola Edge 30 Ultra चे 12 GB रॅम व्हेरियंट लवकरच होणार लाँच

Vivo T1x (ऑफर किंमत: ९,९९९ रुपये)

सेलमध्ये Vivo T1x खरेदी करणार्‍या ग्राहकांना केवळ १,००० रुपयांच्या डिस्काउंट कूपनचा लाभ मिळू शकतो. तसेच, ते बँक ऑफर देखील लागू करू शकतील. ग्राहकांकडे ICICI किंवा Axis बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असल्यास, त्यांना पेमेंट दरम्यान १,००० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कॅशबॅक मिळेल.

वाचा: MMS Case: तुमच्या प्रायव्हेट मुमेंट्सवर हिडन कॅमेराची नजर तर नाही ? असे करा माहित, घ्या विशेष काळजी

Vivo T1 5G (ऑफर किंमत: १३,९९९ रुपये )

Vivo T1 5G स्पेशल फेस्टिव्ह एडिशन आणि इतर व्हेरिएंट फक्त १४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. ICICI किंवा Axis Bank कार्ड्सवर १००० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त १० टक्के कॅशबॅक लाभ देखील असेल.

Vivo T1 Pro (ऑफर किंमत १७,९९९ रुपये )

Flipkart Big Billion Days सेलमध्ये Vivo T1 Pro खरेदी करणाऱ्यांना प्रीपेड ऑर्डरवर ४,००० रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, कंपनी 5G फोनवर २००० रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे आणि जुना एक्स्चेंज फोन केल्यावर त्याची किंमत आणखी कमी होईल. ऑफरसह, १७,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.

Vivo T1 44W (ऑफर किंमत १२,४९९ रुपये )

१,००० रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह हा स्मार्टफोन सेलमध्ये १२,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर ICICI आणि Axis Bank कार्ड्ससह १००० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त १० टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे.

वाचा: ATM मधून पैसे काढताना ‘या’ चुका कराल तर अकाउंट होईल रिकामे, मिनिटांत गमवाल आयुष्यभराची कमाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here