Yellow Alert, राज्याच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी – weather alert imd issue yellow alert to various districts in vidarbha of maharashtra

0
6


मुंबई : भारतात मान्सूनचा पाऊस साधारणपणे जून ते सप्टेंबर महिन्यात होत असतो. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस देखील राज्यातील पावसाचा जोर कायम आहे. राज्यात ठिकठिकाणी जोरादर पाऊस होत आहे. महाराष्ट्रासह देशभरात देखील पाऊस हजेरी लावताना दिसून येतं. भारतीय हवामान विभागानं २३ आणि २४ सप्टेंबरसाठी हवामानाचे इशारे जारी केले आहेत. प्रामुख्यानं या दोन दिवसांमध्ये विदर्भात जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२४ सप्टेंबरसाठी विदर्भाला यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला.

राज्यभरात तुरळक ठिकाणी पाऊस सुरु
राज्यात आज दिवसभरात पालघर जिल्ह्यातील तलासरी, विक्रमगड, जवाहर, वाडा, पालघर, वसई आणि मोखाडामध्ये पावसानं हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, शहापूर, ठाणे, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये आज पाऊस पडला. मुंबईत देखील तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

ठाकरेंनी मैदान मारलं! कोर्टाच्या निर्णयानंतर बाळासाहेबांचा फोटो शेअर करत रोहित पवार म्हणाले.

नागपूरमध्ये भारत ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट
नागपूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी-२० सामना होणार आहे. आजच्या दुसऱ्या मॅचवर पावसाचं सावट निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागानं नागपूर, यवतमाळ आणि वाशिममध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मॅचची नाणेफेक उशिरानं होणार आहे.

रश्मी ठाकरेंना महिला शिवसैनिकांनी खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

उत्तर भारतात पुराची शक्यता

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली, पश्चिम मध्यप्रदेश आणि पूर्व राजस्थाना पूर स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

VIDEO | मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी, शेजारी बसून संदिपान भुमरेंचा आँखों ही आँखों में इशारा

अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तयारीची लगबग; भाविकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे बदल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here