Yuvraj Singh 6 ball 6 sixes, युवीने रचलेल्या इतिहासाला १५ वर्षे पूर्ण, खास व्यक्तीसोबत पाहिले त्या सामन्याचे हायलाइट्स, पाहा VIDEO – yuvraj singh 6 balls 6 sixes record completed 15 years today he post video on social media with his on watching match highlights

0
3


मुंबई-भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस नक्कीच खास आहे. १५ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर २००७ मध्ये युवराज सिंगने डर्बनच्या मैदानावर इतिहास रचला होता. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी २० विश्वचषकात युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकातील सर्व ६ चेंडूत ६ षटकार ठोकले. आफ्रिकन दिग्गज हर्षल गिब्सनंतर एका षटकात सहा षटकार मारणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा फलंदाज ठरला.

युवीने रचलेल्या या इतिहासाला आज १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता १५ वर्षांनंतर युवीने एक खास ट्विट केले आहे. युवराजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखाल शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्वत: मारलेल्या ६ षटकारांचे हायलाइट्स पाहत आहे.

फायनल मॅच आधी एक निनावी फोन आला आणि भारताने मॅच…; टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचा खुलासा

सोशल मीडियावरील व्हिडिओ

युवराज सिंगने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या मुलासोबत हायलाइट्स बघत आहे. युवीने पोस्ट शेअर करत लिहिलंय, ‘१५ वर्षांनंतर हे पाहण्यासाठी यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकला नसता.’ युवीचा मुलगा खूप लक्षपूर्वक टीव्ही पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर युवराज मुलाचा हात धरून षट्कार मारल्यानंतर चियर करताना दिसत आहे. युवीने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम ही युवराज सिंगच्या नावावर आहे.

IND vs AUS-सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला पराभवाचं टेन्शन! भारतीय संघामध्ये दाखल भारतीय संघामध्ये दाखल झालाय मॅच विनर खेळाडू

डावाच्या १९ व्या षटकात ६ षटकार

टी २० विश्वचषकाच्या त्या २१ व्या सामन्यात, भारताच्या डावाचे १८ वे षटक सुरू होते, अँड्र्यू फ्लिंटॉफ गोलंदाजी करत होता आणि तो युवराजसोबत बाचाबाची झाली. फ्लिंटॉफने युवराजला चिडवले होते, परंतु त्याचा फटका ब्रॉडला सहन करावा लागला. १९ व्या षटकात युवराजने ब्रॉडचे सर्व चेंडू सीमारेषेच्या पलीकडे उडवले. क्रिझच्या दुसऱ्या टोकाला उभा असलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी युवीकडे एकटक पाहतच राहिला.

कसोटीपटूचा टॅग दिलेला खेळाडू आता ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवणार, शमीच्या जागी मिळाला भारताला घातक

फ्लिंटॉफसोबतच्या त्या वादावर युवराज सिंग म्हणाला, ‘मला आठवते की मी अँड्र्यू फ्लिंटॉफला दोन चौकार मारले होते आणि साहजिकच त्याला ते आवडले नसते. फ्लिंटॉफ मला म्हणाला, ‘इकडे ये, मी तुझी मान मोडतो.’ युवराजने सांगितले की, ही लढत खूप गंभीर होती. प्रत्येक चेंडूला षटकार मारू, असे मला वाटत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here